Who Is Bhagyashri Borse : दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडाचा ‘किंगडम’ चित्रपट ३१ जुलै रोजी रिलीज होत आहे. हा चित्रपट हिंदीमध्ये ‘साम्राज्य’ या नावाने प्रदर्शित होणार आहे.

या अ‍ॅक्शनपॅक्ड स्पाय ड्रामाबद्दल लोकांमध्ये मोठी चर्चा आहे. भाग्यश्री बोरसे विजयबरोबर चित्रपटात नायिकेची भूमिका साकारणार आहे. ट्रेलरमध्ये विजयबरोबर तिची केमिस्ट्री जबरदस्त दिसत आहे.

दक्षिणेतील अभिनेता विजय देवरकोंडा लवकरच त्याच्या ‘साम्राज्य’ या अदभुत चित्रपटातून रुपेरी पडद्यावर परतणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे, ज्याला पाहून लोकांच्या चांगल्या प्रतिक्रिया येत आहेत. चित्रपटात तो एका गुप्तहेर एजंटची भूमिका साकारणार आहे. ‘साम्राज्य’मध्ये विजयबरोबर भाग्यश्री बोरसे दिसणार आहे. आतापर्यंत तिला इंडस्ट्रीत फारशी प्रसिद्धी मिळाली नाही; परंतु हा चित्रपट तिच्या कारकिर्दीसाठी गेम चेंजर ठरू शकतो.

भाग्यश्री बोरसे कोण आहे?

भाग्यश्री हे इंडस्ट्रीतील मोठे नाव नाही; पण विजयबरोबरचा हा मोठ्या बजेटचा चित्रपट तिच्या कारकिर्दीसाठी गेम चेंजर ठरू शकतो. आतापर्यंत छोट्या भूमिकांमध्ये दिसणाऱ्या भाग्यश्रीसाठी हा चित्रपट महत्त्वाचा ठरणार आहे. फार कमी लोकांना माहीत असेल की, भाग्यश्रीने ‘यारियां २’ या चित्रपटात राजलक्ष्मीची भूमिका साकारली होती.

ती मूळची संभाजीनगरची मराठमोळी मुलगी आहे. या अभिनेत्रीने तिचे शालेय शिक्षण दक्षिण आफ्रिकेतून पूर्ण केले; परंतु पदवीसाठी ती भारतात परतली. बिझनेस मॅनेजमेंटमध्ये पदवी घेतल्यानंतर भाग्यश्रीला अभिनयाची गोडी लागली. या अभिनेत्रीने वयाच्या १८ व्या वर्षी तिच्या मॉडेलिंग कारकिर्दीला सुरुवात केली. कार्तिक आर्यनच्या ‘चंदू चॅम्पियन’ चित्रपटात ती एका छोट्या भूमिकेत दिसली होती.

२०२४ मध्ये तिने तेलुगू चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. ती ‘मिस्टर बच्चन’ या चित्रपटात दिसली; पण हा चित्रपट तिला ओळख मिळवून देऊ शकला नाही. ही अभिनेत्री सतत दक्षिणेत काम करीत आहे; पण ती अद्याप मोठ्या चेहऱ्याचे वलय प्राप्त करू शकलेली नाही. विजयबरोबर ‘साम्राज्य’मध्ये नायिका बनल्यानंतर, तिच्या कारकिर्दीत सुधारणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तिचे अनेक प्रकल्प मार्गावर आहेत. ती दुलकर सलमानबरोबर ‘कांथा’ चित्रपटात दिसणार आहे.

इतकेच नाही, तर या अभिनेत्रीचे आणखी काही प्रकल्प मार्गावर आहेत. ‘साम्राज्य’ आणि ‘कांथा’व्यतिरिक्त भाग्यश्री प्रसिद्ध चित्रपट निर्माते अॅटली यांच्या ‘AA22xA6’ या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट खूप मोठ्या बजेटचा चित्रपट आहे. ‘साम्राज्य’व्यतिरिक्त हा तिला मिळालेला दुसरा प्रोजेक्ट आहे. दोन्ही चित्रपट अभिनेत्रीच्या कारकिर्दीचा आलेख बदलू शकतात. अल्लू अर्जुन AA22xA6 मध्ये मुख्य भूमिकेत असेल. सध्या चित्रपटाच्या निर्मितीचे काम सुरू आहे. त्यात इतर अभिनेत्रींचाही सहभाग आहे.

भाग्यश्री सोशल मीडियावर सक्रिय आहे. तिच्या गोंडस लूक आणि किलर व्यक्तिमत्त्वामुळे ती इंटरनेटवर प्रसिद्ध आहे. तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून असे दिसून येते की, तिला प्रवासाची आवड आहे. तिने बरेच फोटोदेखील शेअर केले आहेत.

‘साम्राज्य’ चित्रपटाबद्दल बोलायचे झाले, तर गौतम तिन्नानुरी यांनी दिग्दर्शित केला आहे. विजय आणि भाग्यश्रीव्यतिरिक्त, रामावथ चिंटू, सत्यदेव कंचरणा व मनीष चौधरी हेदेखील चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसतील. सलग अनेक फ्लॉप चित्रपट देणाऱ्या विजयच्या या चित्रपटाकडून चाहत्यांना खूप अपेक्षा आहेत.