सोशल मिडियावरील बॉयकॉट ट्रेंडमुळे आमिर खानच्या ‘लाल सिंह चड्ढा’ या चित्रपटाला चांगलाच फटका बसला आहे. चित्रपट प्रदर्शित होऊन ४ दिवस उलटून गेले आहेत तरी अजूनही तिकिटबारीवर प्रेक्षकांची गर्दी काहीकेल्या बघायला मिळत नाहीये. या बॉयकॉट ट्रेंडचा फटका आमिरच्या चित्रपटाबरोबर अक्षय कुमारच्या चित्रपटालाही बसला आहे. प्रेक्षकांनी चित्रपटाला बॉयकॉट केलं असलं तरी काही प्रेक्षकांनी सिनेमाचं भरभरून कौतुक केलं आहे. या बॉयकॉट ट्रेंडला धरूनच आता दिग्दर्शक अनुराग कश्यप आणि अभिनेत्री तापसी पन्नू यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

इंडिया टीव्ही आणि एका यट्यूबरला दिलेल्या एका मुलाखतीत अनुराग आणि तापसी यांनी त्यांच्या आगामी चित्रपट ‘दोबारा’ला प्रेक्षकांनी बॉयकॉट कारावं अशी विनंती केली आहे. त्या दोघांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. “ज्याप्रमाणे आमिर आणि अक्षयसारख्या सुपरस्टार्सना बॉयकॉट करून लोकांनी डोक्यावर घेतलं आहे त्याप्रमाणे आम्हालाही बॉयकॉट करून ट्रेंड होऊ द्या!” असं विचित्र वक्तव्य त्यांनी या मुलाखतीत केलं आहे.

aai kuthe kay karte fame milind gawali did film with gracy singh
‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्याने ‘लगान’मधील अभिनेत्रीसह केलंय काम! चित्रपट प्रदर्शित झालाच नाही, शेअर केला व्हिडीओ
Jaya Bachchan Birth Day
Jaya Bachchan: रेखा नावाचं वादळ, राज ठाकरे नावाचा झंझावात परतवणारी चतुरस्र नायिका
crew movie review by loksatta reshma raikwar
Crew Movie Review : रंजक सफर
Narayani Shastri family
पाच बहिणी अन् एक भाऊ, आई महाराष्ट्रीय तर वडील…; प्रसिद्ध अभिनेत्रीने कुटुंबाबद्दल दिली माहिती

खरंतर अनुराग आणि तापसी हे असं मस्करीमध्ये बोलत आहेत. पण त्यांच्या या वक्तव्यामुळे ते चांगलेच ट्रोल होत आहेत. याच मुलाखतीत अनुरागने त्याच्यावर लागलेल्या Me Too संदर्भातल्या आरोपांवरही भाष्य केलं आहे. तसेच या मुलाखतीत तापसी आणि अनुराग या दोघांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बरेच खुलासे केले आहेत.

आणखीन वाचा : ‘मी आनंदाने उड्या मारते’, तापसी पन्नूने केले सुवर्णपदक विजेत्या नीरज चोप्राचे अभिनंदन

अनुराग कश्यप बऱ्याच दिवसांनी पुन्हा दिग्दर्शकाच्या भूमिकेत आपल्याला बघायला मिळणार आहे. ‘दोबारा’ या सस्पेन्स चित्रपटाचं दिग्दर्शन अनुराग करणार असून तापसी पन्नू या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाचं ट्रेलर प्रदर्शित झालं आहे. ट्रेलरवरून या चित्रपटात टाईम ट्रॅव्हल ही संकल्पना आपल्याला बघायला मिळू शकते असा अंदाज वर्तवला जात आहे. १९ ऑगस्ट रोजी हा चित्रपट सिनेगृहात प्रदर्शित होणार आहे.