AR Rahman Birthday Special: जागतिक संगीतावर आपली छाप सोडणारे भारतातील सुप्रसिद्ध संगीतकार ए. आर. रेहमान आज आपला ५६ वा वाढदिवस साजरा करत आहेत. १९९२ सालापासून त्यांनी आजवर अनेक भाषांमधील चित्रपटांमध्ये मंत्रमुग्ध करून टाकणारे संगीत देऊन जगभरातील चाहत्यांची मने जिंकली आहेत. पाश्चात्त्य आणि भारतीय संगीताचा सुंदर मिलाफ त्यांच्या गाण्यांमध्ये पाहायला मिळतो. आपल्या संगीताने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या आणि संगीताच्या क्षेत्राला कलाटणी देणारे रेहमान हे जन्माने मुस्लीम नाही तर हिंदू होते. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त काही गोष्टी जाणून घेऊया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

६ जानेवारी १९६६ साली तामिळनाडूची राजधानी चेन्नईमध्ये रेहमान यांचा जन्म झाला. त्यांचे मूळ नाव दिलीप कुमार होते. रेहमान यांना संगीताचा वारसा वडिलांकडून मिळाला. त्यांचे वडील आर.के.शेखर हे तमिळ आणि मल्याळम चित्रपटांना संगीत द्यायचे. रेहमान नऊ वर्षांचे असतानाच त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला. त्यावेळी आपल्या वडिलांची वाद्ये भाड्याने देऊन त्यांनी कुटुंबाचा गाडा चालवला. काही दिवसांनी त्यांच्या आईने हा व्यवसाय सांभाळला आणि रेहमान यांना कामाचे स्वातंत्र्य दिले. रेहमान उत्कृष्ट की-बोर्ड वाजवायचे. या सगळ्या परिस्थितीने त्यांच्यातला संगीतकार घडला. यातच करिअर करायचे त्यांनी ठरवले आणि ते यशस्वी झाले.

हेही वाचा – “आम्ही दिवसभर ड्रग्स…” सुनील शेट्टीने योगी आदित्यनाथ यांच्या भेटीत केलं वक्तव्य, बॉयकॉट ट्रेंडबद्दल केली चर्चा

१९९२ साली जाहिरातीच्या जिंगलच्या वेगळ्या संगीतावर प्रभावित होऊन मणीरत्नम यांनी रेहमान यांना ‘रोजा’ या चित्रपटासाठी संगीत देण्याचा आग्रह केला. तो आग्रह मान्य करत रेहमान यांनी संगीत दिलं आणि तिथून त्यांच्या यशस्वी कारकिर्दीला सुरुवात झाली. आज तीन दशकांनंतरही रेहमान यांच्या आवाजाची आणि संगीताची जादू कायम आहे.

आणखी वाचा – ए आर रेहमान एका तासाला कमावतात ‘इतके’ कोटी, मानधनाचा आकडा ऐकून व्हाल थक्क

रेहमान जन्माने हिंदू होते, पण वयाच्या २३व्या वर्षी त्यांनी इस्लाम धर्म स्वीकारला. धर्मांतर करण्यामागे त्यांच्या आईचा प्रभाव राहिला. घरातील परिस्थिी बेताची असतानाच त्यांच्या बहिणीला गंभीर आजार झाला होता. डॉक्टरांनीही सर्व उपाय केले, पण तिच्या प्रकृतीत सुधारणा होता नव्हती. याच काळात त्यांची आई एका मुस्लिम फकीरच्या संपर्कात आली आणि रेहमानची बहीण त्या फकीरच्या प्रार्थनेने बरी झाली, त्यानंतर रहमानचा इस्लामवरील विश्वास वाढला. त्यानंतर रेहमानच्या कुटुंबाने धर्मांतर केलं आणि इस्लाम धर्म स्वीकारला. तेव्हाच त्याने त्याचं दिलीप कुमार नाव बदलून अल्लाह रखा रहमान ठेवलं. रेहमानच्या पत्नीचं नाव सायरा बानो आहे.

हेही वाचा – कॅनडाच्या आणखी एका रस्त्याला ए.आर.रेहमानचं नाव : खुद्द रेहमानने ट्वीट करत दिली खुशखबर

२००८ साली प्रदर्शित झालेल्या ‘स्लमडॉग मिलेनियर’ या इंग्रजी चित्रपटाच्या संगीतासाठी ए. आर. रेहमान यांना ऑस्कर, गोल्डन ग्लोब व बाफ्टा पुरस्कार मिळाले आहेत. रेहमान यांचं संगीत प्रेक्षकांसाठी मेजवाणी असते. रेहमान यांच्या संगीताची फक्त भारताने नाही तर जगभराने दखल घेतली आहे. परदेशात रस्त्यांना एआर रेहमान यांचं नाव देऊन त्यांना गौरविण्यात आलं आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why did music composer ar rahman convert to islam know his original name family background hrc
First published on: 06-01-2023 at 09:31 IST