बॉलिवूडची बेबो अभिनेत्री करीना कपूर आणि सैफ अली खानची जोडी ही लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. सैफने या आधी अभिनेत्री अमृता सिंगशी लग्न केले होते. सैफने अमृताला घटस्फोट का दिला त्याचे कारण एका मुलाखतीत सांगितले होते. त्यांच्या घटस्फोटाला बरीच वर्ष झाली असली तरी त्यांच्यामुलांमुळे ते नेहमीच चर्चेत असतात.

सैफ आणि अमृताने १९९१ मध्ये लग्न केले होते. सैफ हा अमृताशी वयाने १२ वर्षांनी लहान आहे. तरी देखील सैफने अमृताशी लग्न केले. सुरुवातीला ते आनंदी होते. मात्र, काही काळानंतर त्यांच्याच वाद होऊ लागले आणि त्यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला.

आणखी वाचा : ‘टिप टिप बरसा पाणी’ गाण्याच्या रिमेकमध्ये कतरिनाला पाहून रवीना म्हणाली…

आणखी वाचा : “आपण हिंदू की मुस्लीम?” आर्यन, सुहानाच्या प्रश्नावर शाहरुखने दिले होते ‘हे’ उत्तर

त्यांचा घटस्फोट झाला असला तरी त्यांच्यात चांगली मैत्री आहे. एका मुलाखतीत घटस्फोटन घेण्याच कारण सांगत सैफ म्हणाला, लग्नानंतर अमृताच्या स्वभावत बदल झाला होता. तो त्याला आवडत नव्हता. एवढंच काय तर ती सतत सैफ, त्याची आई आणि बहिणींचा देखील अपमाण करायची.

आणखी वाचा : “तर निक माझा जीव घेईल…”, प्रियांकाला वाटते पतीची भीती

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुढे सैफ म्हणाला, अमृता सतत टोमणे मारायची. ती त्याला नेहमी जज करायची. त्यासोबत तो एक वाईट पती आणि वाईट वडील आहे असे म्हणायची. सैफ आणि अमृताला दोन मुलं असून सारा आणि इब्राहिम असे त्याचे नाव आहे. अमृतासोबत घटस्फोट घेतल्यानंतर सैफने वयाने १३ वर्ष लहान असलेल्या करीनाशी लग्न केले. त्या दोघांनी २ मुलं असून तैमूर आणि जहांगिर असे त्यांचे नाव आहे.