मराठी चित्रपटसृष्टीमध्ये सध्या प्रचंड चर्चेत असलेला आणि मुक्ता बर्वे ची प्रमुख भूमिका असलेला चित्रपट म्हणजेच ‘वाय’! कन्ट्रोल -एन प्रॉडक्शन्स निर्मित या चित्रपटाची कथा, दिग्दर्शन अजित सूर्यकांत वाडीकर यांनी केले आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर झळकला असून यात हायपर लिंक थरार अनुभवायला मिळत आहे. ही संकल्पना मराठीत पहिल्यांदाच पाहायला मिळणार आहे. येत्या २४ जून रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणाऱ्या ‘वाय’ या शब्दामागे खूप मोठा अर्थ दडलेला आहे. ही आपल्या सर्वांच्या अस्तित्वाची, अस्तित्वासाठीच्या संघर्षाची कहाणी आहे, जी सत्य घटनांवर आधारित आहे.

‘वाय’चा पहिला लुक समोर आल्यापासूनच चित्रपटाबद्दल अनेक प्रश्न प्रेक्षकांच्या मनात उपस्थित झाले होते. त्याच प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी आता ‘वाय’चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. यात मुक्ता बर्वे ही एका शासकीय अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसत असून ती कार्यरत असलेल्या क्षेत्रात काही धक्कादायक गोष्टी घडत आहेत. या घटना दर महिन्याच्या अखेरच्या शुक्रवारी का घडत आहेत? या घटनांमागे काही दृश्य आणि अदृश्य हात आहेत; ज्यातील काही मदतीसाठी आहेत तर काही घात करणारेही आहेत. या सर्व गोष्टींचा शोध घेताना मुक्ता दिसत आहे. यात तिला यश मिळणार की तिचा हा शोध अपूर्णच राहणार ? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे ‘वाय’ पाहिल्यावर मिळणार आहेत.

A chance for historic success for Indian chess players sport news
भारतीय बुद्धिबळपटूंना ऐतिहासिक यशाची संधी!
jallianwala bagh 105 years
जालियनवाला बाग हत्याकांड : १०५ वर्षांपूर्वीच्या रक्तरंजित इतिहासाचे स्मरण! नक्की काय घडले त्या दिवशी?
loksatta viva Artificial Intelligence Lok Sabha Election social media
AIच्या गावात!
chaturgrahi yoga
५० वर्षांनंतर निर्माण होतोय ‘चतुर्ग्रही योग’! या राशींचे नशीब चमकणार, शुक्र अन्, बुधच्या कृपेने मिळेल पैसा, प्रगती अन् यश

आणखी वाचा- “मी तिच्यावर लाखो रुपये…” राखी सावंतच्या आरोपांवर पूर्वश्रमीचा पती रितेश भडकला

या चित्रपटात मुक्तासोबत प्राजक्ता माळी, नंदू माधव, ओमकार गोवर्धन, रसिका चव्हाण, सुहास शिरसाट, संदीप पाठक अशा नामवंत कलाकारांसोबत रोहित कोकाटे, संदीप दंडवते, प्रदीप भोसले आदी कलाकार असल्याचे नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ट्रेलर वरून दिसून येत असल्याने; मराठीतील हा एक मल्टी-स्टारर चित्रपट असल्याचे दिसून येत आहे. मन हेलावून टाकणारा असा हा चित्रपट आहे.

आणखी वाचा- कतरिनाच्या आयुष्यात ‘सवती’ची एंट्री? पती विकी कौशलच्या फोटोवरील कमेंट चर्चेत

‘वाय’ चे दिग्दर्शक अजित सूर्यकांत वाडीकर म्हणतात, ‘’ ही एक वास्तववादी कथा आहे. आपल्या आजुबाजुला अशा अनेक घटना घडत असतात, मात्र आपण त्यापासून अनभिज्ञ असतो. ‘वाय’ च्या निमित्ताने हे भयाण वास्तव प्रेक्षकांच्या समोर आणण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. ‘वाय’ बघून प्रेक्षक अंतर्मुख होऊन नक्कीच विचार करायला लागतील, अशी आशा व्यक्त करतो.’’ पटकथा व संवाद अजित वाडीकर , स्वप्नील सोज्वळ व संदीप दंडवते यांनी लिहिले आहेत. तर कार्यकारी निर्माते विराज विनय मुनोत आहेत.