अभिनेत्री यामी गौतम लवकरच तिचा आगामी चित्रपट ‘अ थर्सडे’मधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मागच्या काही काळापासून सोशल मीडियावर या चित्रपटाची जोरदार चर्चा होताना दिसत असून आता या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. मात्र ट्रेलरमधील यामीचा थरारक अंदाज पाहिल्यावर सर्वच हैराण झाले आहेत. या चित्रपटात यामीसोबत डिंपल कपाडिया, नेहा धुपिया आणि अतुल कुलकर्णी यांच्या मुख्य भूमिका आहेत.

सोशल मीडियावर चर्चेत असलेल्या ‘अ थर्सडे’ चित्रपटाच्या ट्रेलरची सुरुवात एका फोन कॉलने होते. यामी कुलाबा पोलीस ठाण्यात फोन करून सांगते की, ती ज्या शाळेत शिकवते त्या शाळेतील १६ मुलांचं तिने अपहरण केलं आहे. त्यानंतर ती पोलिसांसमोर आपल्या मागण्या ठेवते. त्याच सीनमध्ये नेहा धुपियाची एंट्री होती. नेहा या चित्रपटात पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे.

View this post on Instagram

A post shared by Disney+ Hotstar (@disneyplushotstar)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सध्या सोशल मीडियावर यामीच्या या ‘अ थर्सडे’ ट्रेलरची जोरदार चर्चा आहे. या ट्रेलरमध्ये तिचा धमाकेदार अभिनय पाहायला मिळत आहे. या चित्रपटात अभिनेत्री डिंपल कपाडिया पंतप्रधानांच्या भूमिकेत दिसणार आहे. यामी गौतमची मुख्य भूमिका असलेला ‘अ थर्सडे’ हा एक सस्पेन्स थ्रीलर चित्रपट आहे. चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर सर्वच यामीच्या अभिनयाचं कौतुक करताना दिसत आहेत. हा चित्रपट १७ फेब्रुवारीला हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.