‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकेने काही महिन्यांपूर्वी प्रेक्षकांचा निरोप घेतला. ही मालिका चांगलीच लोकप्रिय ठरली होती. या मालिकेतील प्रत्येक भूमिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली. या मालिकेत अभिनेत्री अदिती सारंगधर हिने मालविका हे नकारात्मक पात्र साकारले होते. अदिती ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय आहे. अदिती सारंगधर हिने नुकतंच ती तिच्या मुलासोबत वेळ कशी घालवते याबद्दल भाष्य केले आहे. तसेच तिच्या मुलाचा स्क्रीन टाईम कमी व्हावा यासाठी तिने अनोखी शक्कल लढवली आहे.

गेल्या काही दिवसांपासून लहान मुलं ही सतत मोबाईल, टीव्हीवर व्यस्त असल्याचे दिसतात. या मुलांचा सतत वाढणारा स्क्रीन टाइम ही पालकांची एक मोठी समस्या बनली आहे. त्यामुळे अनेकजण सातत्याने यासाठी प्रयत्न करताना दिसतात. नुकतचं अभिनेत्री अदिती सारंगधर हिने यावर एक भन्नाट कल्पना शोधून काढली आहे. एका मुलाखतीत तिने याबाबतचा खुलासा केला आहे.

“…अन् लग्नानंतर आमचं पहिलं भांडण हायवेवर झालं होतं”, मराठी अभिनेत्रीने सांगितला ‘तो’ किस्सा

“माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम कमी व्हावा म्हणून मी एक अनोखी युक्ती शोधून काढली आहे. अनेकदा मी त्याला काहीतरी करायला दिलं आणि बाहेर पडली तर तो कंटाळतो. त्यामुळे मी त्याच्या सुट्ट्याच्या वेळी टीव्हीचा वेळ कमी करण्यासाठी विविध रंगाचे प्लेन टीशर्ट मागवते. त्यासोबत काही अॅक्रेलिक रंगही मागवते. त्यानंतर मी माझ्या मुलाला त्यावर हवं ते चित्र किंवा डिझाईन काढायला देते. विशेष म्हणजे त्याने रंगवलेले हे कपडे मी रोजच्या वापरता किंवा बाहेर जाताना सुद्धा घालते.” असेही ती म्हणाली.

यामुळे माझ्या मुलाला त्याने केलेल्या या चित्रांचा कमीपणा वाटत नाही. तसेच त्याने केलेल्या या गोष्टीचा त्याला कमीपणा वाटू नये, ते खराब आहे असं वाटू नये म्हणून त्याची ही कलाकुसर मी सगळीकडे मिरवते. त्यामुळे मीदेखील आता न्यू एज पॅरेंटिंगचा फंडा स्विकारण्याचा प्रयत्न करत आहे, असे अदितीने सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“गोव्याला गेलो तरी २० ते २५ हजार खर्च होतात मग…”, संतोष जुवेकरने चाहत्यांना केलं दत्तक पालक होण्याचे आवाहन

दरम्यान अदिती सारंगधर हिच्या मुलाचे नाव अरिन असे आहे. ती अनेकदा त्याच्यासोबत धमाल व्हिडीओ बनवताना दिसते. तिचे हे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत असतात.