छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिकांपैकी एक म्हणजे ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकेतील स्वीटू आणि ओमकारच्या या जोडीने प्रेक्षकांच्या मनात वेगळे असे स्थान निर्माण केलं आहे. स्वीटू आणि ओमकार परत एकत्र  कधी येणार? हा मोठा प्रश्न सगळ्यांच्या मनात उपस्थित झाला आहे. मालिकेत खूप मोठे ट्विस्ट आले आहे. स्वीटू मनाविरुद्ध मोहितशी लग्न करते. घरातील मंडळी खुश राहावी म्ह्णून ती चेहऱ्यावर हसू ठेवत असते. जरी स्वीटूचे लग्न मोहितशी झाले असले तरी अजूनही या मालिकेचे चाहते त्यांना पुन्हा एकदा एकत्र पाहण्यासाठी खूप उत्सुक आहे.

झी मराठीने नुकताच प्रदर्शित केलेल्या प्रोमोवरुन असं वाटत आहे की, मालिकेत लवकरच स्वीटू आणि ओमकारच्या प्रेम कथा पुन्हा सुरू होणार. मालिकेत तुम्ही पाहिलं असेल की ओमकार स्वतःच्या घरी राहात नव्हता. मात्र आता येणाऱ्या भागात ओमकार घरी परत येईल आणि त्याची आई त्याचे औक्षण करत घरात स्वागत करताना या प्रोमोमध्ये पाहायला मिळेल. या प्रोमोमध्ये स्वीटू ओमकारला पाहुन खुश होते. एका दृश्यात तिच्या हाताला चटका बसतो हे बघताच तो तिला  मदत करत तिला ओरडतो आणि काळजी घेताना आपल्याला दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.


दरम्यान,’येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकेत ओम आणि स्वीटूला पुन्हा एकत्र आणण्यासाठी अभिनेत्री प्रिया मराठेची या मालिकेत एन्ट्री झाली आहे. त्यामूळे ओम आणि स्वीटू यांना परत एकत्र करण्यासाठी प्रिया मराठे यशस्वी होते का?, ओमकारच्या घरी परत येण्याने या दोघांच्या नात्यातील कडूपणा कमी होईल का? ते येत्या काही दिवसांत कळणार आहे.