बॉलिवूड अभिनेत्री सोनक्षी सिन्हा आणि अभिनेता जहीर इक्बाल मागच्या काही काळापासून सतत्याने चर्चेत आहे. दोघंही एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर बऱ्याच काळापासून होताना दिसत आहेत. मात्र दोघांनीही यावर कोणतीही प्रतिक्रिया देणं टाळलं होतं. पण आता सोनाक्षी सिन्हा आणि इक्बाल जहीर यांच्या नात्याचा अखेर खुलासा झाला आहे. इक्बालनं सोशल मीडियावर सोनाक्षीला ‘आय लव्ह यू’ म्हणत रिलेशनशिपच्या चर्चांना पुष्टी दिली आहे.

जहीर इक्बालनं त्याच्या इस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती ज्याच्या कॅप्शनमध्ये त्यानं सोनाक्षीवर प्रेम करत असल्याचं मान्य केलंय. एवढंच नाही तर या पोस्टवर सोनाक्षीनं केलेली कमेंट देखील तेवढीच चर्चेत आहे. सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इक्बाल यांच्या या पोस्टवर सध्या बरेच बॉलिवूड सेलिब्रेटी देखील प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. इक्बालनं सोनाक्षीच्या वाढदिवसानिमित्त एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. ‘वाढदिवसाच्या शुभेच्छा सोनाक्षी… आय लव्ह यू… मला न मारल्याबद्दल धन्यवाद. येत्या काळात आपण असंच खात राहू. प्रेम आणि हास्य सर्वांशी शेअर करू.’

आणखी वाचा- सौदी अरबच्या व्यक्तीने अँबर हर्डला केलं लग्नासाठी प्रपोज, म्हणाला “त्या म्हाताऱ्यापेक्षा मी…”

जहीर इक्बालच्या या पोस्टवर सोनाक्षी सिन्हाची कमेंट देखील चर्चेत आहे. जहीरच्या पोस्टवर प्रतिक्रिया देताना सोनाक्षीनं लिहिलं, “धन्यवाद… खूप प्रेम आणि आता मी तुला मारायला येत आहे.” जहीरच्या या पोस्टवर पत्रलेखा, सिद्धार्थ मल्होत्रा, वरुण शर्मा, तारा सुतारिया आणि हुमा कुरैशी यांनी देखील कमेंट करून या दोघांवर प्रेम व्यक्त केलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इक्बाल लवकरच ‘डबल एक्सएल’ या चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटात हुमा कुरैशीची देखील महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. जहीर इक्बालनं सलमान खान निर्मित ‘द नोटबुक’ या चित्रपटातून बॉलिवूड पदार्पण केलं आहे. दरम्यान सोनाक्षीनं एका मुलाखतीत सांगितलं होतं की बॉलिवूड पदार्पण केलं त्यावेळी ती एका व्यक्तीसोबत रिलेशनशिपमध्ये होती. तिचं हे नातं ५ वर्ष चाललं. पण नंतर त्यांचं ब्रेकअप झालं.