बॉलिवूड अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांची मुलगी अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा गेल्या काही दिवसांपासून खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. सोनाक्षी प्रेमात असल्याचे म्हटले जात आहे. ती ‘द नोटबूक’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारा अभिनेता जहीर इकबालला डेट करत असल्याचे म्हटले जात होते. पण आता जहीरने यावर स्पष्टीकरण दिले आहे.

जहीरने नुकतीच ईटाइम्सला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याला सोनाक्षी सिन्हासोबतच्या अफेअरच्या चर्चांवर प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नाचे उत्तर देत तो म्हणाला, ‘ती माझ्या जवळच्या मैत्रीणींपैकी एक आहे. मला नाही माहिती या अफवा अचानक कशा सुरु झाल्या. आम्ही गेले कित्येक वर्षे एकत्र आहोत. गेली अनेक वर्षे आमच्यामध्ये मैत्रीचे नाते आहे.’
Video: शाळेतील मुलीने दिली धमकी? अभिनेत्रीने व्हिडीओ कॉल केला अन्…

काही दिवसांपूर्वी सोनाक्षीने जहीरसोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. हा फोटो शेअर करत तिने जहीरला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. तेव्हा पासून त्यांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आले होते. पण आता जहीरने यावर वक्तव्य करत चर्चांना पूर्ण विराम दिला आहे.

जहीर आणि सोनाक्षी लवकरच ‘डबल एक्सएल’ या चित्रपटात दिसणार आहेत. या जोडीला एकत्र पाहण्यासाठी चाहते फार उत्सुक आहेत. त्यामुळे चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता पाहायला मिळते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कोण आहे जहीर इकबाल?
जहीर एक चित्रपट अभिनेता आहे. त्याने ‘द नोटबूक’ या चित्रपटातून आपल्या सिनेकारकिर्दीची सुरुवात केली होती. या चित्रपटाची निर्मिती सलमान खानने केली होती. याशिवाय सलमानच्या ‘जय हो’ या चित्रपटात देखील तो झळकला होता. जहीर ‘कुछ कुछ होता है’ फेम अभिनेत्री सना सईदसोबत रिलेशनशिपमध्ये होता असे म्हटले जाते.