बॉलिवूडचा भाईजान अर्थात अभिनेता सलमान खानने आतापर्यंत अनेक नवोदितांनी कलाविश्वात लाँच केलं आहे. यातलीच एक अभिनेत्री म्हणजे झरीन खान. हुबेहूब कतरिना कैफप्रमाणे दिसणाऱ्या जरीनने वीर या चित्रपटातून करिअरची सुरुवात केली. या चित्रपटात तिने सलमान खान आणि सोहेल खान यांच्यासोबत स्क्रीन शेअर केली होती. अलिकडेच झरीनने एक मुलाखत दिली. यावेळी ‘मला सलमानवर ओझं म्हणून रहायचं नाही’, असं झरीनने म्हटल्याचं ‘हिंदुस्तान टाइम्स’च्या वृत्तात म्हटलं आहे.

“सुरुवातीच्या काळातील माझा प्रवास फार कठीण होता. जेव्हा वीर चित्रपट अपयशी ठरला त्यावेळी अनेकांनी मला दोष दिला. परंतु, मला कोणीच समजण्याचा प्रयत्न केला नाही. त्यावेळी मी नवीन होते आणि मी कामात परफेक्ट नव्हते. पण कोणीच मला समजून घेतलं नाही. अनेकांसाठी मी सॉफ्ट टार्गेट झाले. त्या चित्रपटानंतर मला नवीन काम मिळतानाही अडचणी आल्या”, असं झरीनने सांगितलं.

 

View this post on Instagram

 

Some women fear the fire , Some women simply become it ! – R.H.Sin #WednesdayWisdom #ZareenKhan

A post shared by Zareen Khan (@zareenkhan) on

पुढे ती म्हणते, “सलमानमुळे माझं आयुष्य बदललं. पण लोकांना आजही असं वाटतं की सलमानमुळेच मला सगळी कामं मिळतात. परंतु, हे चूक आहे. त्याने फक्त मला कलाविश्वात पदार्पण करुन दिलं. त्यानंतर माझं काम पाहून नवीन चित्रपट मिळत गेले. मला सलमानवर ओझं म्हणून रहायचं नाही. ज्यावेळी मला काम मिळत नव्हतं त्यावेळी सलमानने माझा आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न केला. त्याने पुन्हा माझ्यावर विश्वास ठेवला आणि ‘कॅरेक्टर ढिला’ या चित्रपटात काम दिलं”.

दरम्यान, या लॉकडाउनच्या काळात झरीनला येत असलेल्या समस्यादेखील तिने सांगितल्या. घरात फक्त मी एकटी कमावणारी व्यक्ती आहे आणि आता माझ्याकडचं सेव्हिंगदेखील संपत आलं आहे. झरीनचा कलाविश्वात फारसा वावर नसून ती ‘वीर’, ‘रेडी’, ‘हेटस्टोरी 3’, ‘1921’ या चित्रपटांमध्ये झळकली आहे.