झी मराठी वाहिनीवरील ‘देवमाणूस’ मालिकेमध्ये आमदार बाईंची भूमिका साकारणारी अभिनेत्री तेजस्विनी लोणारी सध्या भलतीच चर्चेत आहे. तेजस्विनी सोशल मीडियावर फारच सक्रिय असते. मालिकेमध्ये साडीमध्ये दिसणारी ही अभिनेत्री खऱ्या आयुष्यामध्ये भलतीच हॉट दिसते. ती वेगवेगळ्या लूकमधील फोटो देखील सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. तेजस्वनिचे रिल व्हिडीओ सध्या सगळीकडेच चर्चेचा विषय ठरत आहेत.
आणखी वाचा – ‘Emergency’ Teaser : माजी पंतप्रधान इंदिरा गांधींच्या भूमिकेत कंगना, टीझरमध्ये अभिनेत्रीला ओळखणंही कठीण
‘देवमाणूस’ मालिकेचा पहिला भाग प्रदर्शित झाला. या मालिकेची लोकप्रियता पाहता ‘देवमाणूस २’ मालिका प्रदर्शित करण्यात आली. या मालिकेला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळताना दिसतो. मालिकेमधील प्रत्येक कलाकार आपल्या वाट्याला आलेली भूमिका उत्तमरित्या साकारत आहे. या मालिकेमध्ये आमदार देवयानी गायकवाड यांची भूमिका साकारणारी अभिनेत्री तेजस्विनीचा तर एक वेगळाच चाहतावर्ग निर्माण झाला आहे.
पाहा व्हिडीओ
तेजस्विनीने पावासाचा आनंद लुटत असताना एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना तिने म्हटलं की, “काय झाडी, काय डोंगार, काय हाटील, ओक्के मधी हाय एकदम.” तेजस्विनीच्या या व्हिडीओ नेटकऱ्यांनी चांगलीच पसंती दिली आहे. तेजस्विनी चित्रीकरणामधून वेळ काढत हिरव्यागार निसर्गामध्ये रमली असल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहेत.
आणखी वाचा – Photos : ‘देवमाणूस’ मालिकेमधील ‘ही’ अभिनेत्री दिसते इतकी ग्लॅमरस, फोटो सोशल मीडियावर व्हायरल
मालिकेमध्ये अगदी साध्य लूकमध्ये दिसणारी ही अभिनेत्री प्रत्यक्षात मात्र खूप वेगळीच आहे. तिचा ग्लॅमरस लूक सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. याआधी तेजस्विनीने काही चित्रपटांमध्येही काम केलं होतं. ही तिची पहिलीच मराठी मालिका आहे. मराठी मालिकेमध्ये काम करणारी तेजस्विनी तिचं काम खूप एण्जॉय करताना दिसते.