एकतर्फी प्रेमाची आठवण वेगळीच असते. ते सांगता येत नाही भासवताही येत नाही. पण जेव्हा वेळ येते तेव्हा ते योग्य त्या व्यक्तीला सांगणे महत्वाचे असते आणि वेळ आली कि ते निभावणे सुद्धा. ही गोष्ट आहे दोन अशा लोकांची जे आयुष्यातील एक वळण संपल्यानंतर आज अनेक वर्षांनी पुन्हा एकमेकांसमोर पण एकमेकाविरुद्ध उभे ठाकले आहेत. प्रेम कधी कोणामध्ये आणि कोणत्या वळणावर होईल खरंच सांगू शकत नाही. ‘प्रेम हे’ची सोमवारी येणारी नवीन गोष्ट आहे ‘ऑब्जेक्शन माय लव्ह’. २४ आणि मंगळवार २५ एप्रिलला स्नेहा चव्हाण आणि चेतन चिटणीस यांच्या मुख्य भूमिका असलेली एक सुंदर, निरागस प्रेमकथा झी युवावर पाहायला मिळणार आहे.
दोन तरुण वकील ‘प्रिया’ आणि ‘निखिल’, त्यांच्या आयुष्यातील पहिला खटला. या अशा काहीशा वातावरणात सुरु होणारा हा धमाल प्रवास प्रेक्षकांना पाहता येणार आहे. पहिल्या खटल्याच्या निमित्ताने दोघेही आपल्या आपल्या अशीलांसोबत केवळ विजयच मिळवायचा या इराद्याने कोर्टरूम मध्ये येतात. त्यानंतर त्यांच्या गोष्टीत येणारा प्रेमाचा ट्विस्ट, कोर्टातील प्रोफेशन वैयक्तिक आयुष्यावर भारी पडते का? किंवा प्रेमामुळे प्रोफेशन वर त्याचा काही परिणाम होतो का? हे या गोष्टीत पाहता येणार आहे.
‘ऑब्जेक्शन माय लव्ह’मध्ये स्नेहा चव्हाण आणि चेतन चिटणीस हे मुख्य भूमिकेत असून, विजय गोखले बऱ्याच काळानंतर छोट्या पडद्यावर दिसणार आहेत. रघुनंदन बर्वे यांनी या कोर्टरुम प्रेमाच्या गोष्टीचे दिग्दर्शन केले आहे.