पुण्यात नव्यानेच एक मत्स्यालय सुरू झाले.
ठिकठिकाणाहून आणलेल्या माशांना तिथल्या काचेच्या तळ्यांमध्ये सोडताना कळले, ‘अरे, आपण तर पुण्यात आलोत !’
मासे जाम खूश झाले ! कारण आता फक्त १० ते १ आणि ४ ते ६ पोहायचे ! दुपारी विश्रांती !!