मुंबईच्या पश्चिम उपनगरीय लोकलमधील साखळी बॉम्बस्फोटांप्रकरणी दोषी ठरविण्यात आलेल्या १२ आरोपींना फाशीची शिक्षा देऊ नका, अशी मागणी त्यांच्या वकिलांकडून सोमवारी न्यायालयाकडे करण्यात आली. याप्रकरणी मोक्का न्यायालयाने १२ जणांना दोषी ठरवले आहे. सोमवारी फाशीची शिक्षा न देता दया दाखविण्याची मागणी त्यांच्या वकिलांकडून करण्यात आली. फाशीच्या शिक्षेबाबत विधी आयोगाने नुकत्याच दिलेल्या अहवालाचा दाखला आरोपींच्या वतीने या वेळी शिक्षेत दया दाखविण्याची मागणी करताना करण्यात आला.
या अहवालानुसार २००० ते २०१५ या कालावधीत खटला चालविणाऱ्या न्यायालयाने दिलेल्या बहुतांश फाशी या उच्च किंवा सर्वोच्च न्यायालयाने रद्द केलेल्या आहेत वा कमी करून त्याचे जन्मठेपेत रूपांतर केलेले आहे. अशा प्रकरणांचे प्रमाण ९५.७ टक्के असल्याचेही आरोपींच्या वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 22, 2015 1:06 am