बांधकाम व्यावसायिक अजय गोसालिया याच्यावर गोळीबार करणाऱ्या हल्लेखोराने काही दिवसांपूर्वी मध्य प्रदेशात एका महिला वकिलाची हत्या केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. राजेंद्रसिंग यादव असे या आरोपीचे नाव असून तो सध्या गुन्हे शाखेच्या ताब्यात आहे.
मालाडच्या इन्फिनिटी मॉलजवळ २८ ऑगस्ट रोजी बांधकाम व्यावसायिक अजय गोसालिया (५४) यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला होता. या हल्ल्यामागे अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन याचा सहभाग होता. गुन्हे शाखा ११ आणि १२ च्या पथकाने या प्रकरणात तपास करून यापूर्वी कौशिक राजगौर आणि अरविंद शिंदे या दोघांना अटक केली होती. त्यानंतर उत्तर प्रदेशातून रोहीत विश्वकर्मा आणि मध्य प्रदेशातून राजेंद्र सिंग यादव उर्फ तिवारी (४३) यांना अटक केली होती. यादव याने १६ ऑगस्ट रोजी मध्यप्रदेशातल्या दातिया जिल्ह्यात एक महिला मिथिलेश सक्सेना या महिला वकिलाची हत्या केल्याचे तपासात उघड झाले आहे. न्यायालयात खटला हरल्याने सक्सेना यांची हत्या करण्यात आली होती.
संग्रहित लेख, दिनांक 11th Sep 2013 रोजी प्रकाशित
बिल्डरवर गोळ्या झाडणारा महिला वकिलाचा मारेकरी
बांधकाम व्यावसायिक अजय गोसालिया याच्यावर गोळीबार करणाऱ्या हल्लेखोराने काही दिवसांपूर्वी मध्य प्रदेशात एका महिला वकिलाची हत्या केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
First published on: 11-09-2013 at 01:02 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Builder attacker is killer of women advocate in mp