मुंबई : करोना संक्र मणापासून बचावासाठी मध्य रेल्वेने नवी शक्कल लढवत तिकीट खिडक्यांवर नोटा सॅनिटाइज करणारे प्रिंटर बसविले आहे. बेस्ट उपक्र माने नोटांची देवाणघेवाण कमी व्हावी म्हणून वाहकांकडे क्यूआर कोड असलेले ओळखपत्र देण्यास सुरुवात के ली आहे. प्रवासी ओळखपत्रावरील कोड स्कॅ न करून यूपीआय अॅपद्वारे तिकिटाचे पैसे भरू शकतो. तर मध्य रेल्वेच्या तिकीट खिडक्यांवर सॅनिटाइज करणारे प्रिंटर बसविण्यात आले आहे. रेल्वेकडे बनावट नोटा ओळखणारे छोटे प्रिंटर (अल्ट्रावॉयलेट मशीन) आहेत. या यंत्रातूनच सॅनिटाइजरची फवारणी नोटांवर होते. यात प्रवाशांचा वेळही जात नाही. सीएसएमटी, दादर, भायखळा, ठाणे, लोकमान्य टिळक टर्मिनस, कल्याण, भिवंडी, बदलापूर, अंबरनाथ, इगतपुरी, आसनगाव, पनवेल, वाशी, बेलापूर, कर्जत, लोणावळा स्थानकातील मेल-एक्स्प्रेसच्या तिकीट खिडक्यांवर तसेच ४९ उपनगरीय स्थानकांतील ८७ तिकीट खिडक्यांवर ही यंत्रे बसवण्यात आली. प्रवाशांकडून नोटा देताघेताना फवारणी के ली जात आहे.
तिकीट तपासनीसांकडेही पोर्टेबल पब्लिक उद्घोषणा यंत्र देण्यात आले आहे. यातून तिकीट तपासनीस पाच ते दहा फू ट अंतरावरील प्रवाशांना सामाजिक अंतर राखावे आणि अन्य मार्गदर्शन करतील, अशी माहिती मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिली.