मध्य रेल्वेमार्गावर शुक्रवारी प्रवाशांनी लोकल ट्रेनवर केलेल्या दगडफेकीनंतर मोटरमन्सनी पुकारलेले काम बंद आंदोलन स्थगित करण्यात आले. पुरेशी सुरक्षा पुरविण्याचे आश्वासन दिल्यानंतर मोटरमन्स काम करण्यास अखेर राजी झाले आहेत. शुक्रवारी सकाळी झालेल्या तांत्रिक बिघाडानंतर ट्रेनच्या मोटरमन्सना प्रवाशांच्या रोषाला सामोरे जावे लागले. प्रवाशांच्या या कृतीच्या निषेधार्थ सर्व मोटारमन्सनी काम बंद करण्याचा निर्णय घेत पुरेशी सुरक्षा मिळेपर्यंत ट्रेनमध्ये पाऊल ठेवण्यास नकार दर्शविला होता. त्यामुळे  मध्य रेल्वेपाठोपाठ हार्बर रेल्वेची सेवाही खंडित होण्याची चिन्हे निर्माण झाली होती.  त्यामुळे  नववर्षांच्या दुसऱ्याच दिवशी मुंबईची जीवनवाहिनी ठप्प झाल्याचे पहायला मिळाले.

गार्ड आणि मोटरमन्स प्रवाशांच्या सेवेसाठी…
गार्ड आणि मोटरमन्स हे प्रवाशांच्या सेवेसाठी आहेत. रेल्वे मागर्गावर होणाऱ्या कोणत्याही तांत्रिक बिघाडला ते जबाबदार नसतात. तरीही त्यांना अशाप्रकारे मारपीट होत असेल, तर पुरेशी सुरक्षा मिळेपर्यंत काम करणे आम्हालाही परवडणारे नाही. – वेणू नायर (महामंत्री, एनआरएमयू)