News Flash

कोविडनंतर पुन्हा लक्षणं दिसल्यास असू शकतो स्वाईन फ्लू; तज्ज्ञांनी दिली महत्त्वाची माहिती

मुंबईत करोना होऊन गेलेल्या रुग्णांना स्वाईन फ्लूची लागण झाल्यानंतर पुन्हा तपासणी करण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

गेल्या वर्षी राज्यात एच१ एन१ संसर्ग झालेल्या ४४ रुग्णांची नोंद झाली होती (Express Photo: Amit Mehra)

देशात सध्या सुरू असलेल्या करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर मुंबईत इन्फ्लूएंझा एच१ एन१ किंवा स्वाइन फ्लूचा धोका जाणवू लागला आहे. स्वाइन फ्लू आणि कोविड -१९ रुग्णांमधील लक्षणे सारखीच असल्याने इन्फ्लूएंझा एच१ एन१च्या लक्षणांचा देखील विचार करण्यात यावा असा सल्ला संसर्गजन्य रोग तज्ज्ञांनी दिला आहे. कारण कोविड उपचारांना रुग्ण प्रतिसाद देत नसल्यास स्वाइन फ्लूची तपासणी करावी असे तज्ञांनी म्हटले आहे. टाईम्स ऑफ इंडियाने याबाबत वृत्त दिले आहे.

सर्दी, ताप आणि डोकेदुखीच्या कारणासाठी आलेल्या दोन रुग्णांना एच१ एन१ची लागण झाल्याचे संसर्गजन्य रोग तज्ज्ञ डॉ वसंत नागवेकर यांनी सांगितले. ३० वर्षीय एक रुग्ण नुकताच करोनातून बरा झालेला असताना पुन्हा लक्षणे जाणवू लागल्याने त्याने डॉ वसंत नागवेकर यांची भेट घेतली होती. पुन्हा लागण होण्याचा प्रकार दुर्मीळ असल्याने त्यांनी त्या रुग्णाचे नमुने चाचणी साठी पाठवले. दरम्यान, रुग्णाला एच१ एन१ची लागण झाल्याचे समोर आले. त्यानंतर डॉ. नागवेकर यांनी आणखी रुग्णांचे नमुने तपासणी साठी पाठवले असता आणखी एक रुग्ण एच१ एन१ संक्रमित तर तिसरा रुग्ण एच३ एन२ संक्रमित असल्याचे आढळले.

हे ही >> वाचा प्लेग ते करोना मार्गे स्वाइन फ्लू

यावर्षात महानगरपालिकेच्या आकडेवारीनुसार एच१एन१ ची दोन प्रकरणे समोर आल्याचे आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले. गेल्या वर्षी करोनाची सुरुवात झाली होती त्यावेळी ४४ रुग्णांची नोंद झाली होती. तर २०१९ मध्ये ४५१ रुग्णांची नोंद झाली होती आणि ५ जणांचा मृत्यू झाला होता.

“कोविड आणि एच१ एन१ हे दोन्ही श्वसनामार्ग होणारे संसर्ग रोग आहेत, म्हणूनच योग्य निदान करणे महत्वाचे आहे”, असे संसर्गजन्य रोग तज्ज्ञ आणि टास्कफोर्सचे सदस्य डॉ. ओम श्रीवास्तव यांनी सांगितले. “दोन विषाणूंमध्ये, त्यांचा जिवंत राहण्याचा कालावधी आणि ते कसे पसरतात यामध्ये समानता आहेत परंतु काही महत्त्वाचे फरक आहेत.” असे डॉ. श्रीवास्तव म्हणाले. एच १ एन १ च्या सकारात्मक अहवालाकडे दुर्लक्ष करू नये कारण यामुळे गंभीर आजार किंवा मृत्यू देखील होऊ शकतो,” असे डॉ. श्रीवास्तव यांनी सांगितले.

हे ही >> करोना’ नसलेल्या रुग्णांवर ‘स्वाइन फ्लू’चे संकट

आकडेवारीनुसार, एच१ एन१ च्या २०१९ मधील २,२८७ रुग्ण आणि २४६ मृत्यूनंतर महाराष्ट्रात गेल्या वर्षी १२१ आणि तीन मृत्यूची नोंद झाली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 21, 2021 10:59 am

Web Title: check for h1n1 if symptoms reappear after covid treatment expert warning abn 97
Next Stories
1 बनावट ओळखपत्रावर लोकल प्रवास करणाऱ्यांना पश्चिम रेल्वेने ठणकावलं, म्हणाले…
2 Mumbai Bank scam : तपास बंद करण्यास न्यायालयाचा नकार!
3 सरनाईक यांच्या पत्रावर सेनेची सावध प्रतिक्रिया भाजपकडून स्वागत
Just Now!
X