News Flash

चालक बेदरकार, मुख्यमंत्र्यांचे क्षमस्व!

ट्विटरच्या माध्यमातून तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

Eknath Khadse, Eknath Khadse , Eknath Khadse resignation, BJP, Devendra Fadnavis, loksatta, Loksatta news, Marathi news

मुंबई-पुणे महामार्गावर धावणाऱ्या एसटी महामंडळाच्या वातानुकूलित शिवनेरी बस गाडीवरील चालक गाडी बेदरकारपणे चालवत असल्याची तक्रार रविवारी एका महिला प्रवाशानी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ट्विटरच्या माध्यमातून केली. यानंतर काही वेळात मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात महिलेची क्षमा मागत चालकांची रितसर चौकशी करून तातडीने कारवाई करण्यात येईल, अशी ग्वाही ट्विटरच्या माध्यमातून दिली. तर बस पावणे नऊच्या सुमारास पुण्यात सुखरुप पोहोचल्याचेही त्यांनी ट्विटरवर नोंदवले.

शनिवारी सर्वसामान्य प्रवाशांच्या तक्रारीनंतर ठाणे पोलिसांना ट्विटरवरून फैलावर घेतल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी रविवारीही

ट्विटरच्या माध्यमातून तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. फडणवीस यांनी दिलेल्या आश्वासनानंतर ट्विटरच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांकडून मुख्यमंत्र्यांचे कौतुक केले जात आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 4, 2016 2:22 am

Web Title: devendra fadnavis 5
Next Stories
1 ‘कलर्स मराठी’वर आजपासून मराठमोळ्या पदार्थाची पंगत!
2 पावसात आनंदाला भरते..!
3 बिल्डरांना वेसण!
Just Now!
X