पवई आयआयटीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्यांचा मृतदेह बुधवारी आढळून आला आहे. अनिकेत अंबोरे (२२) असे त्याचे नाव आहे. त्याने इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली की पडून त्याचा मृत्यू झाला ते स्पष्ट होऊ शकलेले नाही.
अनिकेत आयआयटीमध्ये इलेक्ट्रिक इंजिनियरिंगचे शिक्षण घेत होता. आयआयटीच्या वसतीगृहात तो राहात होता. बुधवारी दुपारी तो वसतीगृहाच्या खालील इमारतीत जखमी अवस्थेत आढळला होता. उपचारासाठी त्याला राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु तेथे उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.
इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून मोबाइलवर बोलत असताना तोल जाऊन तो खाली पडला असावा किंवा त्याने आत्महत्या केली असावी अशा दोन शक्यता वर्तविण्यात येत आहेत. पवई पोलिसांनी याप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. अनिकेतचे कुटुंबीय नवी मुंबईत ऐरोलीला राहतात.
संग्रहित लेख, दिनांक 6th Sep 2014 रोजी प्रकाशित
आयआयटीमध्ये अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचा मृत्यू
पवई आयआयटीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्यांचा मृतदेह बुधवारी आढळून आला आहे. अनिकेत अंबोरे (२२) असे त्याचे नाव आहे.
First published on: 06-09-2014 at 04:39 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Engineering student died in iit