छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील पादचारी पुलाचा स्लॅब कोसळल्याची घटना गुरुवारी संध्याकाळी घडली. टाइम्स ऑफ इंडिया इमारत आणि अंजूमन इस्लाम शाळेजवळ हा पादचारी पूल असून या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाखांची मदत तर जखमींना ५० हजारांची मदत जाहीर केली आहे. या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेशही देण्यात आले आहे.

१) अपूर्वा प्रभू (वय ३५)

२) रंजना तांबे (वय ४०)

३) झायेद सिराज खान (वय ३२)

४) भक्ती शिंदे  (वय ४०)

५) तपेंद्र सिंग (वय ३५)

या दुर्घटनेत ज्या दोन महिला दगावल्या त्या जीटी रूग्णालयाच्या कर्मचारी होत्या अशीही माहिती समोर येते आहे.

जखमींची नावं 

 

 

 


व्हिडिओ

गर्दीच्या वेळीच नेमका हा पूल कोसळला आहे, या ठिकाणी पुलाखाली किती जण होते आणि त्यापैकी किती जण जखमी झाले आहेत ते समजू शकलेले नाहीत. मुंबई पोलिसांनीही यासंदर्भात ट्विट करून माहिती दिली आहे.

सध्या अग्निशमन दलातर्फे मदत आणि बचावकार्य सुरु करण्यात आलं आहे. अग्निशमन दल आणि पोलीस यांचा समावेश आहे, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारीही या ठिकाणी आहेत आणि बचावकार्य राबवत आहेत. या पुलावर असलेलं क्राँक्रिट पूर्णपणे पडलं आहे आता मागे उरला आहे तो या पुलाचा सांगाडा आहे. सध्या घटनास्थळावरून गर्दी हटवणं हे सध्याचं पोलिसांसमोरचं मोठं आव्हान आहे. पुलाचा सांगाडा कोसळण्याची भीती असल्याने अग्निशमन दलाचे अधिकारी तेथील गर्दी कमी करण्याचे काम सुरू आहे. ही गर्दी CST स्थानकाकडे हलवण्यात येत आहे.