‘लोकसत्ता’च्या ‘सर्वकार्येषु सर्वदा’ उपक्रमास यंदाही दात्यांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. मदतीच्या धनादेशांचा ओघ ‘लोकसत्ता’च्या विविध कार्यालयांमध्ये सुरू असून, यंदा प्रथमच या उपक्रमात उपलब्ध करून देण्यात आलेल्या ऑनलाइन देणगीच्या सुविधेचाही लाभ दानशूर घेत आहेत.
‘लोकसत्ता’च्या ‘सर्वकार्येषु सर्वदा’ उपक्रमाचे हे दहावे वर्ष. समाजातील वंचित घटकांसाठी कार्य करणाऱ्या सेवाव्रतींना आर्थिक पाठबळ देण्यासाठी गणेशोत्सवादरम्यान हा उपक्रम राबविण्यात येतो. विविध क्षेत्रांत विधायक कार्य करणाऱ्या संस्था आणि लाखो वाचक यांच्यात ‘लोकसत्ता’ने या उपक्रमाद्वारे दानरुपी सेतू उभारला आहे. यंदा या उपक्रमांतर्गत गणेशोत्सवादरम्यान दहा संस्थांची ओळख करून देण्यात आली होती. त्यानंतर ‘लोकसत्ता’च्या कार्यालयांमध्ये मदतीच्या धनादेशांचा ओघ सुरू झाला. सेवाव्रतींच्या कार्याला आश्वासक दाद मिळत असल्याचे त्यातून दिसते.
यंदा या उपक्रमास कॉसमॉस बॅंकेचे सहकार्य लाभले आहे. त्याआधारे या संस्थांच्या खात्यांत ऑनलाइन देणगी जमा करण्याची सुविधा दानशूरांना उपलब्ध झाली असून, त्यासही मोठा प्रतिसाद मिळत आहे.
‘सर्वकार्येषु सर्वदा’मध्ये यंदा निवडल्या गेलेल्या संस्थांना ऑनलाइन स्वरूपातही देणगी पाठवता येईल. त्यासाठीचे तपशील (खाते क्रमांक, बँक शाखा, आयएफएससी कोड) सोबत दिले आहेत. ऑनलाइन स्वरूपात देणगी पाठविल्यानंतर देणगीदारांनी त्या ऑनलाइन व्यवहाराचे प्रतिमांकन (स्क्रीनशॉट) स्वत:च्या नाव व पत्त्यासह पुढील मोबाइल क्रमांकांवर व्हॉट्सअॅपद्वारे पाठवावेत : पश्चिम महाराष्ट्र व मराठवाडय़ातील ऑनलाइन देणगीदारांसाठी ९८८१२१२९३३, विदर्भातील ऑनलाइन देणगीदारांसाठी ९८१९०८१३१५, तर मुंबई महानगर प्रदेश व कोकणसह राज्याबाहेरील ऑनलाइन देणगीदारांसाठी ९६६५२९२२११.
ऑनलाइन देणगीसाठी तपशील खालीलप्रमाणे
जीवनशाळा
खाते क्रमांक : 01205010169271
(शाखा -दादर)
आयएफएससी कोड : COSB0000012
प्राज्ञपाठ शाळा
खाते क्रमांक : 0770501069331 (शाखा- सातारा)
आयएफएससी कोड : COSB0000077
करुणाश्रम
खाते क्रमांक : 0370501054144 (शाखा- नागपूर)
आयएफएससी कोड : COSB0000037
पंडित बाळकृष्ण बुवा संगीत साधना मंडळ
खाते क्रमांक : 1140501025133 (शाखा- इचलकरंजी)
आयएफएससी कोड : COSB0000114
सार्थक सेवा संघ
खाते क्रमांक : 90605010105453 (शाखा- हडपसर)
आयएफएससी कोड : COSB0000906
डोअरस्टेप स्कूल
खाते क्रमांक : 0070501038614
(शाखा- औंध, सानेवाडी)
आयएफएससी कोड : COSB0000007
आरंभ
खाते क्रमांक : 91205010109925 (शाखा- दशमेश नगर)
आयएफएससी कोड : COSB0000912
वयम्
खाते क्रमांक : 035100109942 (शाखा- नाशिक)
आयएफएससी कोड : COSB0000035
सोहम ट्रस्ट
खाते क्रमांक : 0900501024310 (शाखा- युनिव्हर्सिटी रोड)
आयएफएससी कोड : COSB0000090
सुहित जीवन ट्रस्ट
खाते क्रमांक : 0290501075606 (शाखा- वाशी)
आयएफएससी कोड: COSB0000029