News Flash

सांताक्रूझ, गोरेगाव दरम्यान रविवारी ‘जम्बो ब्लॉक’

रेल्वे स्थानकांदरम्यानची धिम्या मार्गावरील रेल्वे वाहतूक जलद मार्गावरून सोडण्यात येणार आहे.

(संग्रहित छायाचित्र)

मुंबई : रेल्वेमार्ग, सिग्नल आणि ओव्हरहेड वायरच्या दुरुस्तीसाठी रविवार, ३ मार्च रोजी सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ या वेळेत पश्चिम रेल्वेच्या सांताक्रूझ आणि गोरेगाव रेल्वे स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन धिम्या मार्गावर जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे.

जम्बो ब्लॉक काळात या रेल्वे स्थानकांदरम्यानची धिम्या मार्गावरील रेल्वे वाहतूक जलद मार्गावरून सोडण्यात येणार आहे. तर लोकलच्या काही फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत. तसेच धिम्या मार्गावरील सर्व लोकल गाडय़ांना विलेपार्ले रेल्वे स्थानकावरील जलद मार्गावरील फलाट क्रमांक ५/६ वर दोन वेळा थांबा देण्यात येणार आहे. मात्र राम मंदिर रेल्वे स्थानकात या लोकल गाडय़ा थांबणार नाहीत.

मध्य रेल्वे

’ कधी- रविवार, ३ मार्च रोजी सकाळी ११.१५ ते दुपारी ३.१५

’ कुठे- मुलुंड ते माटुंगा अप जलद

हार्बर लाइन

’ कधी- ३ मार्च, सकाळी ११.१० ते दुपारी ३.१०

’ कुठे- कुर्ला-वाशी अप, डाऊन

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 2, 2019 3:01 am

Web Title: jumbo block on sunday between santacruz goregaon
Next Stories
1 ‘गुन्हेगाराचा ठपका पुसण्यासाठी मल्याला भारतात परतावे लागेल’
2 बेकायदा फलकबाजीप्रकरणी काँग्रेस, शिवसेनेला अवमान नोटीस
3 गँगस्टर एजाज लकडावालाचा भाऊ खंडणी मागितल्याप्रकरणी अटकेत
Just Now!
X