‘लेट्स रीड फाऊंडेशन’चा पुढाकार

मुंबई : समाजातील कोणी एक जाणता वाचक मोफत पुस्तके  वाटतो, त्याला प्रतिसादही चांगला मिळतो. पण लोकांनी घेतलेली पुस्तके  खरेच मनापासून वाचली जातात का, याबाबत शंका असते. म्हणूनच ‘लेट्स रीड फाऊंडेशन’ने वाचनासाठी लोकचळवळ सुरू के ली आहे. लोकांनी स्वखर्चातून उभी के लेली चळवळ त्यांना आपली वाटेल आणि ते जाणीवपूर्वक वेळ काढून पुस्तके  वाचली जातील, असा या लोकचळवळीचा हेतू आहे.

काही महिन्यांपूर्वी ‘लेट्स रीड’ने फिरते ग्रंथालय सुरू के ले. एक गाडी विविध ठिकाणी जाऊन वाचकांना मोफत पुस्तके  देते. पुस्तक वाचून झाल्यानंतर त्याबाबतचा अभिप्राय देण्यासही वाचकांना प्रोत्साहन दिले जाते. मात्र, काही वेळा वाचक वाचनासाठी अमर्याद कालावधी घेतात. वेळ मिळाला तर वाचतात, नाही तर नाही. त्यामुळे या प्रक्रियेत लोकांचा सहभाग वाढवण्यासाठी लेट्स रीड प्रयत्न क रत आहे. किमान पाच-सहा हजार लोकसंख्या असलेल्या गावांमध्ये ग्रंथालय उभे करण्यासाठी ५०० पुस्तके  ‘लेट्स रीड’तर्फे  दिली जाणार आहेत. पण त्याआधी ५०० पुस्तके  गावकऱ्यांना स्वखर्चातून खरेदी करावी लागणार आहेत. एक हजार पुस्तके  जमल्यानंतर ‘लेट्स रीडतर्फे  ग्रंथालय व्यवस्थापन प्रणाली मोफत दिली जाईल.

संपूर्ण प्रणालीचे के ंद्रीय नियंत्रण लेट्स रीडकडे असल्याने कोणते पुस्तक कोणत्या वाचकाकडे आहे, याची माहिती मिळत राहील. स्थानिक स्तरावर ग्रंथालयाचे व्यवस्थापन प्राथमिक शिक्षकांच्या हाती दिले जाईल. पुस्तके  दान करण्यासाठी लोकांना आवाहन के ले जात आहे. मात्र, काही वेळा लोकांनी दिलेल्या पुस्तकांमध्ये एकसुरीपणा येतो. हे टाळण्यासाठी समाजमाध्यमाद्वारे संवाद साधून संस्थेने वाचकांची आवडनिवड जाणून घेतली. त्यानुसारच लोकांकडून पुस्तके  स्वीकारली जात आहेत. अ‍ॅमेझॉनवर एक रूम तयार करून तेथेही पुस्तके  स्वीकारली जात आहेत.

मुले पुन्हा पुस्तकांकडे..

’‘पनवेलच्या पंचदीप संकु ल बालग्राम’ अनाथाश्रमातही पुस्तकांची गाडी जाते. अनाथाश्रमात छोटेसे ग्रंथालय आहे. मात्र, तेथे ठरावीकच पुस्तके  आहेत. ‘सध्या शाळा बंद असल्याने मुलांचा दूरचित्रवाणीकडे ओढा वाढला होता. अशावेळी ‘लेट्स रीड’ने राबवलेल्या उपक्रमामुळे मुले पुन्हा पुस्तकांकडे वळली’, असे अनाथाश्रमाचे विनायक पाटील यांनी सांगितले.

’‘लेट्स रीड’च्या फिरत्या ग्रंथालयामुळे वाचनाला दिशा मिळाल्याचे वाचक विनय चव्हाण यांनी सांगितले. ‘पुस्तक एकदा वाचले की ते पडून राहते. त्यापेक्षा फिरत्या ग्रंथालयातून हवे ते पुस्तक मोफत मिळते आणि वाचून झाले की ते परत करता येते. शिवाय विविध दिनविशेषांच्या निमित्ताने संस्थेकडून समाजमाध्यमावर काही प्रश्न विचारले जातात. वाचक त्यावर उत्तरे देतात. त्यातून काय वाचावे, याची माहिती मिळते’, असे विनय यांचे म्हणणे आहे.