गणेशोत्सवासाठी अवघी मुंबापुरी सज्ज होत आहे. गणेशमूर्तीवरून कुंचल्यांचे अखेरचे हात फिरविले जात आहेत. मंडपांमध्ये सजावटीने वेग घेतला आहे. १४ विद्या व ६४ कलांचा अधिपती असलेल्या गणेशाच्या आगमनाची तयारी करताना कलाकारांनाही त्यांचे गुण सर्वासमोर मांडण्याचे व्यासपीठ उपलब्ध होते. समाजमनाचा आरसा दाखवणाऱ्या या गणेशोत्सवात ‘लोकसत्ता गणेश उत्सव मूर्ती स्पर्धा-२०१८’च्या आयोजनाची घोषणा करण्यात आली आहे. दरवर्षीप्रमाणेच यंदाही मोठय़ा दणक्यात या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून ‘मुंबईचा राजा’चा मान  आणि  ५१,००१ रुपयांचे भव्य पारितोषिक कोण मिळवणार याबाबत उत्सुकता वाढली आहे.

या स्पर्धेत कुलाबा ते अंधेरी, जोगेश्वरी ते दहिसर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मुलुंड, ठाणे शहर, डोंबिवली-कल्याण आणि नवी मुंबई (शहर) या विभागांतील मंडळे सहभागी होऊ शकतील. पारितोषिकासाठी मंडळाची निवड करताना सवरेत्कृष्ट मूर्तिकार, कला दिग्दर्शक, संहिता लेखन, उत्कृष्ट मूर्ती, आरास, कला दिग्दर्शन, देखाव्याची कल्पना याबरोबरच जागतिक, राष्ट्रीय, राज्य व स्थानिक पातळीवरील जनजागृती, पारंपरिकता, उच्च कला अभिरुची, पर्यावरण, मंडळाने वर्षभरात केलेले उपक्रम, सामाजिक काम, गणेशमूर्ती देखावा, विषयांची निवड, देखाव्यातील व्यक्तिरेखांच्या उंचीचे मोजमाप, चलचित्रांच्या हालचाली, प्रकाशयोजना, सजावटीचा विषय, मंडळाकडून ठेवली जाणारी स्वच्छता, कार्यकर्त्यांमधील शिस्त, ध्वनिक्षेपकाचा आवाज याचाही विचार करण्यात येणार आहे.

या स्पर्धेत सहभागी झालेल्यांना एकूण २६ पारितोषिके आणि ४४ सन्मानचिन्हे देण्यात येणार आहेत. या स्पर्धेत सवरेत्कृष्ट ठरणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला ‘मुंबईचा राजा’ हा सन्मान आणि ५१,००१ रुपयांचा पुरस्कार देण्यात येणार आहे. पर्यावरणस्नेही सजावटीसाठी १५,००१ रुपयांचे विशेष पारितोषिक देण्यात येणार आहे.

प्रत्येक विभागासाठी १५,००१ रुपयांचे विशेष पारितोषिकही देण्यात येणार असून सवरेत्कृष्ट मूर्तिकार, कला दिग्दर्शक, संहिता लेखक या विभागासाठी प्रत्येकी एक याप्रमाणे वैयक्तिक २,५०१ रुपये रोख, मानचिन्ह आणि सन्मानचिन्ह असे विशेष पारितोषिक देण्यात येणार आहे. त्याचबरोबर स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्वच गणेशोत्सव मंडळांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.

प्रायोजक

‘वीणा वर्ल्ड’ प्रस्तुत ‘लोकसत्ता गणेश उत्सव मूर्ती स्पर्धा-२०१८’चे सहप्रायोजक एलआयसी ऑफ इंडिया, रिजन्सी ग्रूप, पॉवर्ड बाय व्ही. पी. बेडेकर अ‍ॅण्ड सन्स, मिलसेंड्स आणि बी. जी. चितळे, इंडियन ऑइल, पितांबरी प्रोडक्ट्स प्रा. लि. आणि बँकिंग पार्टनर अभ्युदय को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड आहेत.

विनामूल्य प्रवेशिका येथे उपलब्ध

* मुंबई – ‘लोकसत्ता’, मफतलाल सेंटर, सातवा मजला, नरिमन पॉइंट, मुंबई – २१

संपर्क – धर्मेश म्हसकर – ९७७३१५४९२४

* ठाणे (पश्चिम) – ‘लोकसत्ता’, कुसुमांजली, दुसरा मजला, कॉसमॉस बँकेच्या वर, गोखले मार्ग, नौपाडा, ठाणे

संपर्क – मिलिंद दाभोळकर – ९१६७२२१२४६

* डोंबिवली पूर्व – सप्तशर्ती ज्वेलर्स – मंदार न्यूज पेपर्स एजन्सी, कस्तुरी प्लाझा, मानपाडा रस्ता, डोंबिवली

संपर्क – महेश ठोके – ९८३३६१०३७५

* कल्याण (प.) – बुधकर पब्लिसिटी प्रायव्हेट लिमिटेड, भूपेंद्र ६-१, पहिला मजला, महालक्ष्मी हॉटेलवर, शिवाजी पथ, रोहित पानसरे – ९८१९७६७१३३

* नवी मुंबई – अनंत वाकचौरे ९३२२९०६५०६, हर्षल खैरे ९०८२९७४८८६

(भरलेल्या प्रवेशिका येथेच स्वीकारल्या जातील.)

  • प्रवेशिकांचे वाटप :

८ व ९ सप्टेंबर, सकाळी १०.३० ते सायं. ५.३०

  • प्रवेशिका स्वीकारण्याच्या तारखा :

१० व ११ सप्टेंबर. सकाळी १०.३० ते सायं. ५.३०