रेल्वेमार्गावरील महत्त्वपूर्ण अभियांत्रिकी कामासाठी रविवारी मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वेमार्गावर मेगाब्लॉक होणार आहे. या ब्लॉकदरम्यान तीनही मार्गावरील काही सेवा रद्द असतील. तसेच गाडय़ा वेळापत्रकापेक्षा २०-२५ मिनिटे उशिराने धावतील. कुर्ला आणि वाशीदरम्यान सकाळी ११ ते दुपारी तीनपर्यंत वाहतूक पूर्ण बंद राहाणार आहे. ब्लॉकचा तपशील खालीलप्रमाणे :
मध्य रेल्वे

’कुठे? – माटुंगा ते मुलुंडदरम्यान डाऊन जलद मार्ग.
’कधी? – सकाळी १०.४५ ते दुपारी ३.१५.
’परिणाम? – सर्व डाऊन जलद गाडय़ा माटुंग्यापुढे डाउन धीम्या मार्गावर धावतील. ठाण्यापासून त्या पुन्हा डाऊन जलद मार्गावर जातील. या कालावधीत मुंबईकडे जाणाऱ्या जलद गाडय़ा मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला या स्थानकांवरही थांबतील.
हार्बर रेल्वे
’कुठे? – कुर्ला ते वाशी वाहतूक बंद.
’कधी? – सकाळी ११.०० ते दु. ३.००.
’परिणाम? – ब्लॉकदरम्यान केवळ सीएसटी ते कुर्ला आणि वाशी ते पनवेल यादरम्यान विशेष सेवा. या कालावधीत हार्बर मार्गावरील प्रवाशांना त्याच तिकिटांच्या आधारे मुख्य तसेच ट्रान्स हार्बर मार्गावर प्रवासास परवानगी.
पश्चिम रेल्वे
’कुठे? – अंधेरी ते बोरिवलीदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर
’कधी? – सकाळी १०.३५ ते दु. २.३५.
’परिणाम? – वसई, विरार, भाईंदर येथे जाणाऱ्या जलद गाडय़ा अंधेरी ते बोरिवलीदरम्यान सर्व स्थानकांवर थांबतील. या दरम्यान सर्व बोरिवली गाडय़ा बोरिवली स्थानकात फलाट क्रमांक ७, ८, १, २ आणि ३ येथे थांबतील. तर विरार गाडय़ा बोरिवली येथे १, २ आणि ३ या फलाटावर येतील. लांब पल्ल्याच्या गाडय़ा बोरिवली येथे ६, ६-अ आणि ३ या क्रमांकांच्या फलाटावर थांबतील. काही सेवा रद्द राहतील.