कल्याणहून छत्रपती शिवाजी टर्मिनसला जाणाऱ्या लोकलचा पेन्टाग्राफ कुर्ला- शीव स्थानकादरम्यान तुटल्यामुळे रेल्वे सेवेवर परिणाम झाला होता. लांबपल्ल्याच्या गाडय़ा अप मार्गावरुन वळवाव्या लागल्या. शनिवारी अर्धा दिवस भरुन कामावरुन घरी जाण्यासाठी निघालेल्या मुंबईकरांना त्याचा फटका बसला.
कल्याण-छत्रपती शिवाजी टर्मिनस रेल्वे गाडी शीव आणि कुर्ला रेल्वे स्थानकांदरम्यान पोहोचत्याच तिचा पेंन्टाग्राफ तुटला. ही घटना शनिवार दुपारी. १२.३० च्या सुमारास घडली. त्यामुळे कर्जत लोकल आणि लांबपल्ल्याची रेल्वेगाडी अप मार्गावरुन सोडावी लागली. त्यामुळे लोकल सेवेवर परिणाम झाल्या. रेल्वे धावत नसल्याने मध्येच उतरुन प्रवाशांना पायपीट करीत रेल्वे स्थानक गाठावे लागले.पेन्टाग्राफच्या दुरुस्तीनंतर १.१५ च्या सुमारास रेल्वे गाडय़ा सुरू झाल्या. मात्र मेन लाईनवरील रेल्वे १० ते १५ मिनिटे विलंबाने धावत होत्या.