20 September 2018

News Flash

Heavy Rains in Mumbai :पुढच्या १२ तासात मुंबईला मुसळधार पावसाचा इशारा, कुर्ल्यात रेल्वे ट्रॅकवर पाणी

Heavy Rains in Mumbai : मागच्या काही दिवसांपासून दडी मारुन बसलेल्या मान्सूनच्या पावसाने शनिवारपासून राज्यात चांगलाच जोर पकडला आहे. मुंबई आणि कोकणात मुसळधार पाऊस कोसळत

Heavy Rains in Mumbai: मागच्या काही दिवसांपासून दडी मारुन बसलेल्या मान्सूनच्या पावसाने शनिवारपासून राज्यात चांगलाच जोर पकडला आहे. मुंबई आणि कोकणात मुसळधार पाऊस कोसळत असून रविवारी रात्रभर झालेल्या पावसामुळे मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचले आहे.

HOT DEALS
  • Honor 7X 64 GB Blue
    ₹ 15375 MRP ₹ 16999 -10%
  • ARYA Z4 SSP5, 8 GB (Gold)
    ₹ 3799 MRP ₹ 5699 -33%
    ₹380 Cashback

कुर्ला, सायन येथे रेल्वे ट्रॅकवर पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. रात्रभर झालेल्या पावसामुळे आधीच तिन्ही रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. लोकल ट्रेन १५ ते २० मिनिट उशिराने धावत आहेत. असाच पाऊस सुरु राहिला तर मुंबईत रेल्वे वाहतूक ठप्प होण्याची शक्यता आहे.

हवामान विषयक अंदाज वर्तवणाऱ्या स्कायमेटने कोकण, गोवा आणि कर्नाटकच्या किनारपट्टी भागात मुसळधार पाऊस कोसळेल असा अंदाज वर्तवला आहे. मुंबईत पुढच्या १२ तासात मुसळधार पावसाचा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे.

First Published on June 25, 2018 8:38 am

Web Title: next 12 hours heavy rain expected in mumbai
टॅग Mumbai,Rain