विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मराठा व मुस्लिम समाजाला आरक्षण जाहीर करून विविध समाज घटकांना खुश करण्याचा सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रयत्न सुरू असतानाच आता राज्यातील इतर मागास वर्ग (ओबीसी) सरकारच्या विरोधात दंड थोपटून उभा राहिला आहे.
ओबीसींची राजकीय पिळवणूक करणाऱ्या प्रस्थापित राजकीय पक्षांना धडा शिकवण्यासाठी ओबीसी बांधव निवडणुकीच्या मैदानात उतरतील, अशी घोषणा सत्यशोधक ओबीसी परिषदेचे अध्यक्ष हनुमंत उपरे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केली.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on July 18, 2014 4:39 am