मध्य रेल्वे
अप धीम्या मार्गावरील अंशत: जलद सेवा (सेमी फास्ट) सकाळी ११.०३ ते दुपारी ३.५४ या वेळेत कल्याण ते मुलुंड या दरम्यान अप जलद मार्गावर वळविण्यात येणार आहे.
कुठे- कल्याण ते ठाणे अप धीम्या मार्गावर
कधी- सकाळी ११.३० ते दुपारी ४.००
परिणाम-
*अप धीम्या मार्गावरील अंशत: जलद सेवा (सेमी फास्ट) सकाळी ११.०३ ते दुपारी ३.५४ या वेळेत कल्याण ते मुलुंड या दरम्यान अप जलद मार्गावर वळविण्यात येणार आहे. त्यामुळे कल्याण येथून सुटणाऱ्या उपनगरी गाडय़ा डोंबिवली व ठाणे रेल्वे स्थानकांवरच थांबणार आहेत. मधल्या स्थानकांत थांबणार नाहीत.
*छत्रपती शिवाजी टर्मिनस येथून सकाळी १०.०८ ते दुपारी २.४० या वेळेत डाऊन जलद मार्गावरील उपनगरी गाडय़ा घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड येथे तर ठाणे येथून मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या दिशेने अप जलद मार्गावरील उपनगरी गाडय़ा सकाळी १०.५० ते दुपारी ३.३६ या वेळेत मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला येथे थांबणार आहेत.
*या कालावधीत अप धीम्या मार्गावर ठाकुर्ली, कोपर, दिवा, मुंब्रा, कळवा या स्थानकांवर गाडय़ा थांबणार नाहीत. येथे जाणाऱ्या येणाऱ्या प्रवाशांना डोंबिवली आणि ठाण्यापर्यंत जाऊन पुढे किंवा मागे प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

हार्बर रेल्वे
कुठे- कुर्ला ते वाशी अप आणि डाऊन मार्गावर
कधी- रविवार १ जून २०१४ रोजी सकाळी ११.०० ते दुपारी ३.००.
परिणाम-
*पनवेल, बेलापूर आणि वाशी येथून छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या दिशेने सुटणाऱ्या गाडय़ांची वाहतूक सकाळी १०.२० ते दुपारी ३.०४ या वेळेत बंद राहणार आहे. तर छत्रपती शिवाजी टर्मिनस येथून पनवेल, बेलापूर आणि वाशी येथे जाणाऱ्या उपनगरी गाडय़ांची वाहतूक सकाळी १०.२३ ते दुपारी ३.०१ या वेळेत बंद राहणार आहे.  
*छत्रपती शिवाजी टर्मिनस ते कुर्ला आणि वाशी- पनवेलसाठी विशेष गाडय़ा सोडण्यात येणार आहेत. हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत या मार्गावरील प्रवाशांना मार्गे ट्रान्स हार्बर मार्ग व मुख्य मार्गावरून प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे.