कुर्ला स्टेशनवर प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर भिंत कोसळल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. यात चार जण जखमी झाले असून रेल्वे सेवेवर या घटनेचा परिणाम झालेला नाही.

कुर्ला स्टेशनवर प्लॅटफॉर्म क्रमांक एकवरील संरक्षक भिंत शुक्रवारी सकाळी दहाच्या सुमारास कोसळली. घटनेची माहिती मिळताच पोलीस, महापालिका आणि अग्निशमन विभागाचे पथक घटनास्थळी पोहोचले. यात घटनेत सिराज (वय ३०), लखन खातल (वय २९) आणि लक्ष्मण पाटील (वय ४०), आणि अमिर कसिन (वय ५८) हे चार जण जखमी झाले. चौघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.