News Flash

राज ठाकरे एम. एफ हुसैन यांचा वारसा चालवत आहेत का?, नेटकऱ्यांचा सवाल

भाजपाला पाठिंबा देणाऱ्या फेसबुक पेजवर राज ठाकरेंवर कडाडून टीका

(संग्रहित छायाचित्र)

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या व्यंगचित्रात गणपतीच्या रुपात मोदींना दाखवले आहे. तसेच मोदी हे प्रसिद्धी विनायक आहेत अशी टीका केली. यानंतर राज ठाकरेंवर सोशल मीडियावर कडाडून टीका होते आहे. भाजपाचे समर्थन करणारे ‘पुन्हा नरेंद्र पुन्हा देवेंद्र मिशन २०१९’ नावाचे एक फेसबुक पेज आहे. यावर तर चक्क राज ठाकरे हे व्यंगचित्रकार म्हणून बाळासाहेब ठाकरेंच्या ऐवजी हिंदू देवतांची नग्न चित्रे काढणाऱ्या एम. एफ. हुसैन यांचा वारसा चालवत आहेत का? असा प्रश्न विचारण्यात आला आहे.

हिंदूंच्या भावना दुखावारे व्यंगचित्र काढून गणपतीचा अपमान करणाऱ्या राज ठाकरेंची खतना झाली आहे का? असाही प्रश्न या पेजवर विचारण्यात आला आहे. ही भाजपाची अधिकृत भूमिका नाही. भाजपाला पाठिंबा देणाऱ्या या फेसबुक पेजवर राज ठाकरेंवर सडकून टीका करण्यात आली आहे. एवढेच नाही तर राज ठाकरे मुर्दाबाद, राज माफी मागा अशी मागणीही या फेसबुक पेजवर करण्यात आली आहे. हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे दूरदृष्टे होते, त्यांनी राजची खाज आधीच ओळखली असाही टोला लगावण्यात आला आहे.

राज ठाकरे यांनी मोदींवर टीका करणारे व्यंगचित्र सोमवारी पोस्ट केले. या व्यंगचित्रात गणपतीच्या रूपात मोदींना दाखवले असून खाली उंदीर म्हणून अमित शाह दिसतात. विशेष म्हणजे त्या गणपतीला मोदी स्वत: ओवाळत आहेत. बाजूला अमित शाह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राजनाथ सिंह ही नेहमीची मंडळी दिसतात. मोदींच्या वाढदिवसानिमित्त राज यांनी हे व्यंगचित्र काढले. ज्यावरून त्यांच्यावर चांगलीच टीका झाली. आता ‘पुन्हा नरेंद्र पुन्हा देवेंद्र मिशन २०१९’ या फेसबुक पेजवर टीका करण्यात आली आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 18, 2018 3:43 pm

Web Title: raj thakre is try to going on m f hussain foot steps ask social media page
Next Stories
1 तुम्ही एखादी वेगळी रेसिपी ट्राय करता? मग हे वाचाच
2 या दर्ग्यातील झाडाच्या फळाने तृतीयपंथीयालाही म्हणे अपत्यप्राप्ती, मौलानांवर कारवाईची मागणी
3 बँकांचे १२२४ कोटींचे कर्ज थकवल्या प्रकरणी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांना नोटीस
Just Now!
X