17 December 2017

News Flash

बाळासाहेबांच्या भेटीला राजू शेट्टी “मातोश्री’वर

स्‍वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि खासदार राजू शेट्टी यांनी आज (शनिवार) 'मातोश्री'वर जाऊन बाळासाहेबांच्‍या

मुंबई | Updated: November 17, 2012 4:21 AM

स्‍वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि खासदार राजू शेट्टी यांनी आज (शनिवार) ‘मातोश्री’वर जाऊन बाळासाहेबांच्‍या प्रकृतीची विचारपूस केली. ऊसदराच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अटक करण्यात आलेल्या शेट्टी यांना काल (शुक्रवार) बारामतीच्या सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर त्यांनी आज मोतोश्रीवर जाऊन बाळासाहेबांची भेट घेतली.  
दरम्यान, शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांची प्रकृती थोडी बिघडल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्‍यामुळे ‘मातोश्री’वर बाळासाहेबांना भेट देणा-यांची त्यांनी आज भेट घेतली नाही. शिवसेनेच्‍या सर्व नगरसेवकांना आज ‘मातोश्री’वर बोलाविण्‍यात आले होते. रश्मी ठाकरे यांनी नगरसेवकांशी संवाद साधला. या सर्वांना बाळासाहेबांच्‍या प्रकृतीची माहिती देण्‍यात आली. मात्र, उध्दव ठाकरे या नगरसेवकांना भेटले नाहीत.
दोन दिवसांपूर्वी बाळासाहेबांची भेट घेणारे राष्‍ट्रवादी कॉंग्रेसचे अध्‍यक्ष शरद पवार आज पुन्हा ‘मातोश्री’वर जाणार होते. परंतु, त्‍यांनी आपला दौरा रद्द केला आहे.
आज कवी अशोक नायगावकर, रामदास फुटाणे, अरुण म्‍हात्रे इ. मान्‍यवरांनी ‘मातोश्री’वर जाऊन बाळासाहेबांच्‍या प्रकृतीची चौकशी केली.

First Published on November 17, 2012 4:21 am

Web Title: raju shetty came to meet balasaheb at matoshree