News Flash

चिमुरडीवर बलात्कार करून हत्या करणाऱ्या नराधमास फाशी!

सात वर्षांच्या मुलीवर निर्घृणपणे बलात्कार करून तिची गळा दाबून हत्या करणाऱ्या ५० वर्षांच्या नराधमाला दिंडोशी सत्र न्यायालयाने शुक्रवारी फाशीची शिक्षा सुनावली.

| September 28, 2013 12:04 pm

सात वर्षांच्या मुलीवर निर्घृणपणे बलात्कार करून तिची गळा दाबून हत्या करणाऱ्या ५० वर्षांच्या नराधमाला दिंडोशी सत्र न्यायालयाने शुक्रवारी फाशीची शिक्षा सुनावली. बाबासाहेब कांबळे (५०) असे या आरोपीचे नाव आहे. गोरेगाव (प.) येथील रहिवाशी असलेला कांबळे हा रिक्षाचालक आहे. घटनेच्या दिवशी म्हणजेच २८ ऑक्टोबर २०११ रोजी परिसरातच राहणाऱ्या या मुलीला कांबळेने स्वत:साठी पानमसाला आणण्याच्या बहाण्याने घरातून बाहेर बोलावले. कांबळेने त्या वेळी भरपूर मद्यपान केले होते. मुलगी पानमसाला घेऊन आल्यावर त्याने तिला घरात नेऊन तिच्यावर बलात्कार केला. आपल्या या कृत्याबाबत कुणाला कळू नये म्हणून त्याने तिची गळा दाबून नंतर हत्या केली.  सहा महिन्यांपूर्वीच खटल्याच्या सुनावणीला सुरुवात झाली आणि २९ साक्षीदार तपासण्यात आले. सात वर्षांच्या मुलीवर निर्घृणपणे बलात्कार करून नंतर गळा दाबून तिची हत्या करणे हे ‘दुर्मिळातील दुर्मीळ’ प्रकरण असल्याने कांबळेला फाशीची शिक्षा देण्याची मागणी पोलिसांकडून करण्यात आली होती. न्यायालयाने बलात्काराच्या आरोपात कांबळेला जन्मठेपेची, तर अल्पवयीन मुलीची निर्घृण हत्या केल्याच्या आरोपात फाशीची शिक्षा सुनावली आहे. कांबळे याच्यावरील हा पहिलाच गुन्हा नाही, तर २००२ मध्येही त्याने अशाच प्रकारचा गुन्हा केला होता. मात्र पुराव्याअभावी त्याची सुटका झाली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 28, 2013 12:04 pm

Web Title: rapist and murderer of little kid get death sentence
टॅग : Death Sentence,Rapist
Next Stories
1 बलात्कार, हत्येप्रकरणी दुहेरी जन्मठेपेची शिक्षा
2 लोहारिया हत्येतील बिजलानीचा तारांकित निवास : पोलीस-डॉक्टरांवर कारवाईचे उच्च न्यायालयाचे आदेश
3 सरकार हतबल!
Just Now!
X