सनदी लेखापालांमधील आरोपी मी नाही
छगन भुजबळ यांच्यासह सहा जणांवर दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रात आरोपी म्हणून आपल्या नावाचा उल्लेख करण्यात आला आहे. मात्र आपला त्या प्रकरणाशी कोणताही संबंध नसल्याचा खुलासा सनदी लेखापाल रवींद्र सावंत यांनी केला आहे. याबाबत सावंत यांनी सांगितले की, छगन भुजबळ यांचा व माझा वैयक्तिक परिचय नाही. भुजबळांच्या व त्यांच्या नातेवाईकांचा आणि त्यांच्या संबंधातील कोणत्याही संस्थेचा मी सनदी लेखापाल नव्हतो. ज्या व्यवहारांमधून व्यवहारात मी सल्लागार अथवा भागीदार नव्हतो. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुंबई मंडळाच्या अधीक्षक अभियंत्यांनी पाच प्रकल्पांबरोबर कालिना ग्रंथालय इमारत प्रकल्पाकरिता निविदा देकारांमधील वित्तीय बाबींचे मूल्यमापन करण्याकरिता माझी नेमणूक केली होती. त्याप्रमाणे चार निविदांपैकी दोन निविदाधारक पात्र असल्याचा निर्वाळा दिला होता. यातील दोन निविदांपैकी एकच निविदा तांत्रिक समितीने पास केली होती. मात्र त्याच्याशी माझा कोणताही सबंध नव्हता. असे सावंत यांनी पत्राद्वारे स्पष्ट केले.
संग्रहित लेख, दिनांक 20th Apr 2016 रोजी प्रकाशित
रवींद्र सावंत यांचा खुलासा
आपला त्या प्रकरणाशी कोणताही संबंध नसल्याचा खुलासा सनदी लेखापाल रवींद्र सावंत यांनी केला आहे.
Written by लोकसत्ता टीम
Updated:
First published on: 20-04-2016 at 00:01 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ravindra sawant name not mentions as accused in the charge sheet