22 September 2020

News Flash

शोभा डे यांच्याविरुद्ध हक्कभंग दाखल

मराठी चित्रपट प्राईम टाईमला दाखवण्याच्या निर्णयाविरोधात ट्विट करणाऱ्या प्रसिद्ध लेखिका शोभा डे यांच्या विरोधात शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी हक्कभंग प्रस्ताव दाखल केला होता.

| April 12, 2015 01:39 am

मराठी चित्रपट प्राईम टाईमला दाखवण्याच्या निर्णयाविरोधात ट्विट करणाऱ्या प्रसिद्ध लेखिका शोभा डे यांच्या विरोधात शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी हक्कभंग प्रस्ताव दाखल केला होता. हा हक्कभंग प्रस्ताव विधानसभा अध्यक्षांनी दाखल करून घेतला आहे.  यासंदर्भात शोभा यांना नोटीस बजावण्यात आली असून, येत्या आठ दिवसात उत्तर देण्याचे आदेश नोटीसद्वारे देण्यात आले आहेत.
पाईम टाईमला मराठी चित्रपट दाखवणं अनिवार्य करण्याची घोषणा राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी केली होती. मराठी चित्रपट प्राईम टाईमला दाखविण्याच्या निर्णयाला विरोध करत शोभा डे यांनी ट्विटरवरून फडणवीस सरकार हुकुमशहा प्रवृत्तीचे असल्याचे ट्विट केले होते. या वादग्रस्त ट्विटच्या मुद्द्यावरून बुधवारी विधानसभेत लेखिका शोभ डे यांच्या विरोधात शिवसेना आणि राष्ट्रवादीने आक्रमक पवित्रा घेऊन हक्कभंग प्रस्ताव सादर केला. तसेच डे यांनी जाहीर माफी मागावी अशी मागणी देखील केली. मात्र या नोटीसबाबतही डे यांनी ट्विट केले की,”माफी मागण्यासाठी हक्क भंगाची नोटीस बजावली? कम ऑन, महाराष्ट्रीयन असल्याचा मला अभिमान आहे, तसेच माझे मराठी सिनेमांवर प्रेम आहे आणि ते नेहमीच राहील.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 12, 2015 1:39 am

Web Title: shobhaa de in trouble for tweet against maharashtra govt
टॅग Pratap Sarnaik
Next Stories
1 वांद्र्यात पोलिसांकडून सर्वपक्षीय नेत्यांना ताब्यात घेण्याचा धडाका
2 १२ टोलनाक्यांना टाळे
3 शिक्षकी नोकरीची हमी नाही!
Just Now!
X