News Flash

दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचा अभ्यास जिओ ज्ञानगंगावर

ओ टीव्हीवरील तीन वाहिन्यांवर रोज सहा तास तासिका प्रक्षेपित केल्या जातील व इतर अठरा तास त्याचे पुनप्रक्षेपण

संग्रहित छायाचित्र

शाळा बंद असतानाही शिक्षणासाठी आता दूरचित्रवाणी वाहिनीचाही पर्याय उपलब्ध झाला आहे. जिओ टीव्हीवर बारावी विज्ञान आणि दहावीच्या मराठी आणि इंग्रजी माध्यमासाठी ‘जिओ ज्ञानगंगा’ या तीन वाहिन्यांचे रविवारी उद्घाटन करण्यात आले.

शालेय शिक्षणमंत्री वर्षां गायकवाड यांनी या उपक्रमाचे उद्घाटन केले. त्याचबरोबर जिओ सावन या रेडिओ चॅनेलवर ‘वुई लर्न इंग्लिश’ या कार्यक्रमाचेही उद्घाटन करण्यात आले.

शाळा बंद असल्या तरी राज्यातील मुलांचे शिक्षण थांबू नये यासाठी शालेय शिक्षण विभागाकडून विविध उपाय योजण्यात येत आहेत. जिओ टीव्हीवरील तीन वाहिन्यांवर रोज सहा तास तासिका प्रक्षेपित केल्या जातील व इतर अठरा तास त्याचे पुनप्रक्षेपण केले जाणार आहे. याचे वेळापत्रक www.maa.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल.

येत्या काळात अजून ९ वाहिन्या सुरू केल्या जाणार आहेत. दहावी उर्दू माध्यम, नववी, आठवी, सातवी, सहावी, तिसरी आणि चौथी या इयत्तांसाठी इंग्रजी, उर्दू आणि मराठी माध्यमातील वाहिन्या सुरू करण्यात येणार आहेत.

‘राज्यातील ४.३ कोटी लोकांकडे जिओ फोन, जिओ मोबाइल आहेत. जिओ टीव्हीद्वारे विद्यार्थी अभ्यास करू शकतील.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 6, 2020 12:40 am

Web Title: study of 10th and 12th class students on jio dnyanganga abn 97
टॅग : Coronavirus
Next Stories
1 पाऊसधारांमुळे ‘संचार’बंदी
2 पोलीस आयुक्तांना पुन्हा गृहमंत्र्यांचा धक्का
3 ‘चतुरंग चर्चा’मध्ये आज शिक्षणतज्ज्ञांशी संवाद
Just Now!
X