अभियांत्रिकी आणि देखभाल कामांसाठी मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार दरम्यान अप व डाऊन धिम्या मार्गावर रविवारी ११ एप्रिलला मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. तसेच कुर्ला ते वाशी अप आणि डाऊन हार्बर मार्गावरही ब्लॉक घेतला जाणार आहे. पायाभूत सुविधा आणि दुरुस्तीचे काम केले जाणार आहे.
मध्य रेल्वे
कधी : रविवारी, ११ एप्रिल, स. १०.५५ ते दु. ३.५५ वा.
कुठे : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार धिम्या मार्गावर
परिणाम : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकातून सुटणाऱ्या धिम्या मार्गावरील गाड्या जलद मार्गावर वळविण्यात येतील. घाटकोपर येथून सुटणाऱ्या अप धिम्या मार्गावरील गाड्या विद्याविहार ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळविण्यात येतील. अप आणि डाउन मार्गावरील गाड्या विद्याविहार, करी रोड, चिंचपोकळी, सँडहस्र्ट रोड आणि मशिद या स्थानकांवर थांबणार नाहीत.
पश्चिम रेल्वे
कधी : रविवारी, ११ एप्रिल, स. १०.३५ ते दु. ३.३५
कुठे : चर्चगेट ते मुंबई सेंट्रल अप आणि डाउन धिम्या मार्गावर
परिणाम : धिम्या मार्गावरील गाड्या जलद मार्गावर चालविण्यात येणार आहेत. तसेच ब्लॉक दरम्यान अप आणि डाउन मार्गावरील काही लोकल गाड्या रद्द केल्या आहेत.
हार्बर रेल्वे
कधी : रविवारी, ११ एप्रिल, स. ११.१० ते सायं. ४.१० वा.
कुठे : कुर्ला-वाशी अप आणि डाउन हार्बर मार्गावर
परिणाम : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून वाशी, बेलापूर, पनवेलकडे जाणाऱ्या आणि येणाऱ्या लोकल गाड्या रद्द राहतील. तसेच ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कुर्ला स्थानकादरम्यान, तसेच पनवेल ते वाशी स्थानकादरम्यान विशेष लोकल गाड्या चालविण्यात येतील. हार्बर मार्गावरील प्रवाशांना स. १० ते सायं ४.३० या वेळेत मुख्य मार्ग आणि ट्रान्सहार्बरवर प्रवासास मुभा.