मुंबईतील माटुंगा स्टेशनजवळ तांत्रिक बिघाड झाल्याने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेने जाणाऱ्या जलद लोकल ट्रेन्सचा खोळंबा झाला आहे. काही वेळापूर्वीच ही बातमी समोर आली आहे. याआधी सकाळी ११ च्या दरम्यान सँडहर्स्ट रोडवर भिंत कोसळल्याची बातमी आली होती. ज्यानंतर मध्य रेल्वेची धीम्या मार्गावरची वाहतूक जलद मार्गावर वळवण्यात आली. आता माटुंग्याजवळ तांत्रिक बिघाड झाला असल्याची माहिती समोर आली आहे.

मुंबईत पावसाने गेल्या दोन दिवसांपासून दाणादाण उडवून दिली आह. अशात लोकल प्रवासी सेवेवर काहीही परिणाम होत असतोच. तसाच तो झाला असल्याचे या दोन घटनांवरून समोर येते आहे. हा तांत्रिक बिघाड दूर होईपर्यंत मध्य रेल्वेवर माटुंगा स्टेशनवर जलद लोकल्सचा खोळंबा झाला आहे. सकाळपासूनच मुसळधार पावसामुळे मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वे मार्गावर लोकलची वाहतूक १५ ते २० मिनिटे उशिराने होत होती. अशात आता माटुंग्याजवळ तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती समोर आली आहे.