सीबीआय मृत्यू प्रकरणाच्या चौकशीतून सीबीआय काय सत्य शोधणार याची आम्हालाही प्रतीक्षा आहे असं वक्तव्य महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलं आहे. सुशांत सिंह मृत्यू प्रकरणाचा तपास मुंबई पोलीस करत होते. मात्र तडकाफडकणी हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आलं. त्यामुळे आता सीबीआयकडून या प्रकरणाची चौकशी होते आहे. लोक विचारत आहेत की सुशांतने आत्महत्या केली की त्याची हत्या झाली? या प्रश्नाचं नेमकं काय उत्तर सीबीआय देणार याची आम्हीही वाट बघतो आहोत असंही अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे. एएनआयने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने १४ जून रोजी त्याच्या राहत्या घरी आत्महत्या केली. वांद्रे येथील त्याच्या घरी त्याने आत्महत्या केली. यानंतर सुशांत सिंह राजपूत याने हिंदी सिनेसृष्टीतल्या कंपूशाहीमुळे आत्महत्या केली असा आरोप केला गेला. त्यासंदर्भातल्या काही बातम्याही समोर आल्या. त्यानंतर या प्रकरणातला हा अँगल तपासण्यासाठी मुंबई पोलिसांनी हस्तक्षेप केला. दरम्यान हे सगळं प्रकरण सीबीआयकडे वर्ग करण्यात आलं आहे.

अभिनेत्री कंगना रणौतने या सगळ्यासंदर्भात आवाज उठवला होता. त्यानंतर या सगळ्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला. मुंबई पोलीस या प्रकरणी योग्य रितीने तपास करत होते आणि हे प्रकरण घाईने सीबीआयकडे सोपवण्यात आलं असं राज्य सरकारने म्हटलं होतं. आता या प्रकरणी सीबीआय नेमकं काय सत्य समोर आणणार याची आम्हीही वाट पाहतो आहोत असं आता अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे.