मुंबई : गुंतवणुकीवर चांगला परतावा देण्याच्या नावाखाली अनेक गुंतवणुकदारांची फसवणूक केल्याप्रकरणातील आरोपी अंबर दलाल विरोधात मुंबई पोलीसांनी लुक आऊट सर्क्युलर (एलओसी) जारी केले आहेत. याप्रकरणी आतापर्यंत २०० हून अधिक गुंतवणूकदारांची १०० कोटींपेक्षा जास्त रुपयांची फसवणूक झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. तक्रारदारांमध्ये एका प्रसिद्ध अभिनेत्याचाही समावेश आहे.

हेही वाचा >>> मुंबई : १२४ वर्षे जुन्या बंगल्याचे पाडकाम, मंगळवारपासून कारवाईला सुरुवात

मुंबईच्या ओशिवरा पोलिसांनी १५ मार्च रोजी रिट्झ कन्सल्टन्सी सर्व्हिसेस कंपनीचे मालक दलाल यांच्याविरुद्ध सुरुवातीला डझनभर गुंतवणूकदारांची ५४ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. जुहू येथील फॅशन डिझायनर बबिता मलकानी यांच्या तक्रारीवरून याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी तक्रारदारांची संख्या वाढली आहे. त्यामुळे फसवणुकीची रक्कम १०० कोटींहून अधिक झाली आहे. याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखा अधिक तपास करत आहे.

हेही वाचा >>> गावी जाणाऱ्या मतदारांना कसे रोखणार? लोकसभा निवडणुकीआधी राजकीय पक्षांसाठी नवी डोकेदुखी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तक्रारीनुसार, एप्रिल २०२३ मध्ये एका मैत्रिणीने तक्रारदार महिलेची अंबर दलालशी ओळख करून दिली होती. त्याने तिला गुंतवणुकीवर आकर्षक नफा देऊ केला. तसेच प्रत्येक महिन्याला १.५ ते १.८ टक्के परतावा देण्याचे आश्वासन दिले. तक्रारदार महिलेने गुंतवणूक केली आणि तिला वचन दिलेले परतावे मिळाल्यावर तिने आणखी गुंतवणूक केली. एप्रिल २०२३ ते मार्च २०२४ दरम्यान तक्रारदाराने ५४ कोटी ४५ लाखांची गुंतवणूक केली. त्यानंतर आरोपीने फसवणूक करून पैसे घेऊन पळ काढल्याचा आरोप आहे.