मध्य रेल्वे प्रशासनाने उन्हाळ्याच्या सुट्टीनिमित्त पाच उन्हाळी विशेष गाड्यांच्या १०० फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे रेल्वे प्रवाशांची अतिरिक्त गर्दी विभागणे शक्य होणार आहे. मध्य रेल्वेवर पुणे – सावंतवाडी रोडदरम्यान २० विशेष फेऱ्या, पनवेल – करमळी १८ विशेष फेऱ्या, पनवेल-सावंतवाडी रोड २० विशेष फेऱ्या, लोकमान्य टिळक टर्मिनस – कन्याकुमारी १८ विशेष फेऱ्या, पुणे जंक्शन – अजनी २२ विशेष फेऱ्या होणार आहेत.

गाडी क्रमांक ०१२१३ विशेष एक्स्प्रेस पनवेल येथून ३ एप्रिल ते ५ जूनदरम्यान दर सोमवारी रात्री ९.३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ८.३० वाजता करमळी येथे पोहचेल. गाडी क्रमांक ०१२१४ विशेष एक्स्प्रेस करमळी येथून ४ एप्रिल ते ६ जूनदरम्यान दर मंगळवारी सकाळी ९.२० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री ८.३० वाजता पनवेल येथे पोहोचेल. या दोन्ही फेऱ्यांना रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवि येथे थांबा देण्यात येणार आहे.

हेही वाचा >>>सलग दुसऱ्यांदा मुंबईला ’जागतिक वृक्षनगरी’ बहुमान; जगातील वृक्षसंपदा समृद्ध शहरांमध्ये समावेश

गाडी क्रमांक ०१२१५ विशेष एक्स्प्रेस पनवेल येथून ४ एप्रिल ते ६ जूनदरम्यान दर मंगळवारी रात्री ९.३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ८.३० वाजता सावंतवाडी रोड येथे पोहचेल. गाडी क्रमांक ०१२१६ विशेष एक्स्प्रेस दर सोमवारी सावंतवाडी रोड येथून ३ एप्रिल ते ५ जूनदरम्यान सकाळी १०.१० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री ८.३० वाजता पनवेल येथे पोहचेल. या दोन्ही फेऱ्यांना रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ येथे थांबा देण्यात येणार आहे.

हेही वाचा >>>म्हाडाच्या ५६ निवासस्थानांमध्ये सेवानिवृत्तांचे बेकायदा वास्तव्य! नव्या सेवानिवासस्थानांसाठी सामान्यांच्या घरांवर डोळा?

गाडी क्रमांक ०१४६३ विशेष एक्स्प्रेस लोकमान्य टिळक टर्मिनस येथून ६ एप्रिल ते १ जूनदरम्यान दर गुरुवारी दुपारी ४ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री ११.२० वाजता कन्याकुमारी येथे पोहचेल. गाडी क्रमांक ०१४६४ विशेष एक्स्प्रेस कन्याकुमारी येथून ८ एप्रिल ते ३ जूनदरम्यान दर शनिवारी दुपारी २.१५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री ९.५० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल. या दोन्ही फेऱ्यांना ठाणे, पनवेल, रोहा, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, सावंतवाडी रोड, मडगाव जंक्शन, कारवार, उडुपी, मंगळुरू जंक्शन, कासारगोड, कन्नूर, कोझिकोडे, तिरूर, शोरानूर, त्रिशूर, एर्नाकुलम टाउन, कोट्टावलम, कोट्टाला चेंगन्नूर, कायनकुलम, कोल्लम जंक्शन, तिरुवनंतपुरम सेंट्रल, नागरकोइल जंक्शन येथे थांबा देण्यात येणार आहे.

गाडी क्रमांक ०१२११ विशेष एक्स्प्रेस पुणे येथून २ एप्रिल ते ४ जूनदरम्यान दर रविवारी रात्री ९.३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ९.३० वाजता सावंतवाडी रोड येथे पोहचेल. गाडी क्रमांक विशेष एक्स्प्रेस ५ एप्रिल ते ७ जूनदरम्यान दर बुधवारी सावंतवाडी रोड येथून सकाळी १०.१० वाजता सुटेल आणि त्याचदिवशी रात्री ११.५५ वाजता पुणे येथे पोहचेल. या दोन्ही फेऱ्यांना लोणावळा, कल्याण, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ येथे थांबा देण्यात येणार आहे.

हेही वाचा >>>मुंबई : पत्रकाराच्या मारहाणप्रकरणी तक्रार रद्द, अभिनेता सलमान खान याला उच्च न्यायालयाचा दिलासा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गाडी क्रमांक ०११८९ विशेष एक्स्प्रेस पुणे जंक्शन येथून ५ एप्रिल ते १४ जूनदरम्यान दर बुधवारी दुपारी ३.१५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ४.५० वाजता अजनी येथे पोहचेल. गाडी क्रमांक ०११९० विशेष एक्स्प्रेस अजनी येथून ६ एप्रिल ते १५ जूनदरम्यान दर गुरुवारी सायंकाळी ७.५० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ११.३५ वाजता पुणे जंक्शन येथे पोहचेल. या दोन्ही फेऱ्यांना दौंड कॉर्ड लाइन, अहमदनगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, अकोला, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा येथे थांबा देण्यात येणार आहे. या विशेष एक्स्प्रेसचे आरक्षण विशेष शुल्कासह ३१ मार्चपासून सर्व संगणकीय आरक्षण केंद्रांवर आणि आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर करता येणार आहे.