एमएमआरडीए अधिकाऱ्याच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण(एमएमआरडीए) यांच्यामार्फत वितरीत करण्यात येणाऱ्या ५३ सदनिका लाटण्यासाठी बनावट कागदपत्र तयार केल्याच्या आरोपाखाली १२ जणांना साकीनाका पोलिसांनी मंगळवारी अटक केली. याप्रकरणी या ५३ सदनिकांची किंमत सुमारे १० कोटी रुपये असून तेवढ्या रकमेची फसवणूक झाल्याचा आरोप एमएमआरडीएने केलेल्या तक्रारीत केला आहे. त्यानुसार साकीनाका पोलिसांनी आरोपींविरोधात फसवणूक व बनावट कागदपत्र तयार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा >>> सहा वर्षांनंतरही हॅँकॉक पुलाचे काम अपूर्णच; उच्च न्यायालयाने फटकारले

एमएमआरडीए अधिकारी सागर तोरणे(३५) यांच्या तक्रारीवरून ५३ सदनिका धारक व त्यांना बनावट कागदपत्र तयार करण्यात मदत केल्याच्या आरोपाखाली सुमारे ६० जणांविरोधात साकीनाका पोलिसांनी फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे. तक्रारीनुसार, कुर्ला पश्चिम येथील पुनर्वसन प्रकल्पांतर्गत ५७६ प्रकल्प बाधितांना सदनिकांचे वितरणपत्र व चावी वाटप सोमवारी करण्यात आले. त्यापैकी ५३ सदनिका लाटण्यासाठी आरोपींनी बनावट कागदपत्र सादर केल्याचे एमएमआरडीए अधिकाऱ्यांच्या सतर्कतेमुळे लक्षात आले. अखेर याप्रकरणी एमएमआरडीएकडून तक्रार करण्यात आल्यानंतर याप्रकरणी साकिनाका पोलिसांनी गुन्हा दाखल करून प्रदिप यादव, राजेश यादव, सुनील यादव, अवधेश यादव, सुदर्शन यादव, नखडु यादव, सुभाष यादव, कुणाल घोलप, आकाश भोसले व मोहम्मद तौफीक सय्यद यांना अटक केली. आरोपींसह ४८ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांनी १० कोटी ६ लाख रुपयांची सरकारची फसवणूक केल्याचा आरोप आहे.

हेही वाचा >>> रोजगार मेळ्यात अनुकंपा तत्वावरील उमेदवारांची नियुक्ती; मध्य रेल्वेच्या पुणे विभागात ४२ जणांना नियुक्ती पत्रे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विमानतळ प्राधिकरणाच्या मुंबई येथील जागेवरील प्रकल्पबाधितांचे पुनर्वसनाबाबत राज्य सरकारने एमएमआरडीएची प्रकल्प समन्वयक संस्था म्हणून नेमणूक केली आहे. त्या अंतर्गत कुर्ला प्रीमियर येथील इमारत क्रमांक २ मध्ये क्रांतीनगर मधील ४०६ प्रकल्प बाधितांना सदनिका मिळणार आहे. तर इमारत क्रमांक ३ मध्ये क्रांतीनगर मधील १६१ आणि संदेशनगर मधील ३९४ प्रकल्प बाधितांना घर मिळणार आहेत. त्याच्या चावी वाटपाचा कार्यक्रम सध्या सुरू आहे.