मुंबई : पश्चिम रेल्वेवरील वातानुकूलित लोकलच्या तांत्रिक बिघाडाची मालिका सुरूच असून मंगळवारी तब्बल १३ वातानुकूलित लोकल बंद करण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला. वातानुकूलित लोकल रद्द करून या ठिकाणी सामान्य लोकल चालवून, पासधारक वातानुकूलित लोकल प्रवाशांच्या तोंडाला पाने पुसली जात आहेत.

पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात एकूण ७ लोकल आहेत. या लोकलच्या एकूण ७९ फेऱ्या धावतात. मात्र वातानुकूलित लोकलची देखभाल-दुरुस्तीतच अडचणी येत असल्याने लोकल धावत असताना, लोकलचे दरवाजे बंद न होणे, वातानुकूलित यंत्रणा कुचकामी ठरणे असे प्रकार वारंवार होत आहेत. या प्रकारामुळे वातानुकूलित लोकलच्या प्रवाशांना प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागतो. अनेक प्रवाशांनी याबाबत संताप व्यक्त केला आहे. त्याकडे दुर्लक्ष करून पश्चिम रेल्वे त्याच चुका पुनःपुन्हा करत आहे. परिणामी सामान्य लोकलच्या तुलनेत महागडे असे वातानुकूलित लोकलचे तिकीट काढून देखील सामान्य लोकलमधून प्रवास करावा लागत आहेत.

हेही वाचा >>>रेल्वेत जवानाकडून चौघांची हत्या; जयपूर-मुंबई एक्सप्रेसमधील थरार, आरोपी अटकेत

हेही वाचा >>>राज्यपाल नामनिर्देशित १२ आमदारांचा वाद पुन्हा उच्च न्यायालयात; भूमिका स्पष्ट करण्याचे सरकारला न्यायालयाचे आदेश

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तांत्रिक बिघाडामुळे १३ वातानुकूलित लोकल रद्द

  • सकाळी ६.५७ महालक्ष्मी-विरार धीमी
  • सकाळी ८.३३ विरार-चर्चगेट धीमी
  • सकाळी ८.४१ वसई रोड-चर्चगेट जलद
  • सकाळी १०.२४ चर्चगेट-बोरिवली धीमी
  • सकाळी ११.३५ बोरिवली- चर्चगेट धीमी
  • दुपारी १२.४५ चर्चगेट-बोरिवली धीमी
  • दुपारी १.५५ बोरिवली-चर्चगेट धीमी
  • दुपारी ३.०५ चर्चगेट-बोरिवली धीमी
  • दुपारी ४.१८ बोरिवली-चर्चगेट जलद
  • सायंकाळी ५.१५ चर्चगेट-बोरिवली जलद
  • सायंकाळी ६.०८ बोरिवली-चर्चगेट जलद
  • सायंकाळी ७ चर्चगेट-वसई रोड जलद
  • रात्री ९.५७ चर्चगेट-विरार जलद