scorecardresearch

मुंबई – पुणे द्रुतगती महामार्गावर आज दोन तासांचा वाहतूक ब्लॉक

या कामासाठी मंगळवारी दुपारी १२ ते २ या वेळेत वाहतूक ब्लॉक घेतला जाणार आहे. त्यामुळे या वेळेत मुंबईकडून पुण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक पूर्णत: बंद राहणार आहे.

traffic block on mumbai pune expressway,
(संग्रहित छायाचित्र)

मुंबई : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर मंगळवारी (२१ नोव्हेंबर) दोन तासांचा वाहतूक ब्लॉक घेण्यात येणार  असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळा(एमएसआरडीसी)कडून देण्यात आली आहे. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेवर ३५/५०० किमी अंतरावर हायवे ट्राफिक मॅनेजमेंट सिस्टीमअंतर्गत गँट्री उभारण्याचे काम एमएसआरडीसीकडून केले जाणार आहे.

हेही वाचा >>> हुशार असूनही लायकी नसणाऱ्यांच्या हाताखाली काम करण्याची वेळ! मनोज जरांगे यांचे विधान

special train on Mumbai to Nagpur route
रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! या मार्गावर दोन दिवस धावणार विशेष गाडी
ghodbander road traffic
ठाणे खाडी किनारी मार्गावर दोन ठिकाणी जंक्शन; बाळकुम आणि खारेगाव परिसर मार्गाला जोडणार
there is no mega block on central railway on sunday
Mumbai local: मध्य रेल्वेवर रविवारी मेगाब्लॉक नाही
kashedi tunnel open for ganpati
मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतुकीचे अडथळे दूर, कोकणवासीयांना दिलासा; कशेडी बोगद्यातून वाहतूक सुरू

या कामासाठी मंगळवारी दुपारी १२ ते २ या वेळेत वाहतूक ब्लॉक घेतला जाणार आहे. त्यामुळे या वेळेत मुंबईकडून पुण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक पूर्णत: बंद राहणार आहे. तर या कालावधीत मुंबईकडून पुण्याकडे जाणाऱ्या हलक्या वाहनांची वाहतूक शेडुंग फाटा येथून वळवून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ जुना मुंबई -पुणे द्रुतगती महामार्गावरील शिंग्रोबा घाटातून द्रुतगती मार्गाच्या मॅजिक पॉइंट येथे पुन्हा मुंबई -पुणे द्रुतगती मार्गावर मार्गस्थ करण्यात येणार आहे. गँट्री बसविण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर अर्थात दुपारी २ नंतर मुंबईकडून पुण्याकडे जाणारी वाहतूक पूर्ववत होणार आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: 2 hours traffic block between 12 noon to 2 pm on mumbai pune expressway on november 21 zws

First published on: 21-11-2023 at 03:38 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×