मुंबईतील अँटॉप हिल परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. येथील एका २२ वर्षीय तरुणाने आपल्या पत्नीला मारहाण केल्यानंतर स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. रविवारी दुपारी ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून घटनेचा पुढील तपास केला जात आहे.

नेमकं काय घडलं?

‘फ्री प्रेस जर्नल’ने दिलेल्या वृत्तानुसार, रणजीत देवेंद्र असं मृत पावलेल्या २२ वर्षीय तरुणाचं नाव आहे. तो मुंबईतील अँटॉप हिल परिसरातील रहिवासी असून तो डिलिव्हरी एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करत होता. रविवारी दुपारी त्याचा पत्नीशी वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्यानंतर त्याने आपल्या पत्नीला मारहाण केली. यावेळी त्याने पत्नीला चापट मारली. यानंतर पीडित महिला बेशुद्ध झाली आणि जमिनीवर कोसळली.

हेही वाचा- “होय, बलात्कार करण्यासाठी घरात शिरलो, पण…”, मुंबईतील एअर हॉस्टेसच्या हत्येप्रकरणी आरोपीची धक्कादायक कबुली

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यानंतर घाबरलेल्या रणजीतने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. पत्नीला जेव्हा शुद्ध आली, तेव्हा पती रणजीत पंख्याला लटकलेल्या अवस्थेत दिसला. प्राथमिक माहितीच्या आधारे पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. घटनेचा पुढील तपास केला जात आहे.