scorecardresearch

पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत ३० टक्के मृत्यू पहिल्या तीन दिवसांत

दुसऱ्या लाटेतील ६० हजार २२ मृत्यूंचा अभ्यास मृत्यू विश्लेषण समितीने केला आहे.

पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत ३० टक्के मृत्यू पहिल्या तीन दिवसांत
(संग्रहित छायाचित्र)

मुंबई:  राज्यात दुसऱ्या लाटेमध्ये झालेल्या मृत्यूंपैकी सुमारे ३० टक्के मृत्यू हे रुग्णालयात दाखल झाल्यानंतर पहिल्या तीन दिवसांत झाल्याचे विश्लेषणात्मक अभ्यासातून समोर आले आहे. पहिल्या लाटेतही हीच स्थिती होती. त्यामुळे आता संभाव्य तिसऱ्या लाटेमध्ये तरी रुग्णांनी वेळेत निदान करून वेळेत रुग्णालयात दाखल झाल्यास मृत्यू रोखणे शक्य होईल असे तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

दुसऱ्या लाटेतील ६० हजार २२ मृत्यूंचा अभ्यास मृत्यू विश्लेषण समितीने केला आहे. यात सर्वाधिक १८ हजार ३३ मृत्यू(३० टक्के) हे रुग्णालयात दाखल केल्यानंतर पहिल्या तीन दिवसांत झाल्याचे समोर आले आहे.

आठवडय़ात सुमारे ५३ टक्के मृत्यू झाल्याचे आढळले आहे. पहिल्या लाटेत झालेल्या ३९,६८८ मृत्यूचा अभ्यास करण्यात आला असून यातही रुग्णालयातील सर्वाधिक १२,५०१ म्हणजे सुमारे ३० टक्के मृत्यू हे पहिल्या तीन दिवसांमध्ये झाल्याचे आढळले आहे. पहिल्या लाटेत देखील ५३ टक्के मृत्यू हे आठवडाभरात झाल्याचे दिसून आले आहे.

संभाव्य तिसऱ्या लाटेमध्ये तरी रुग्णांनी वेळेत निदान करून लवकर रुग्णालयात दाखल झाल्यास मृत्यू रोखता येतील, असे मत मृत्यू विश्लेषण समितीचे डॉ. अविनाश सुपे यांनी व्यक्त केले.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या