मुंबई विद्यापीठाच्या पीएचडी प्रवेशपूर्व परीक्षेसाठी (पेट) ४७८१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून ही परीक्षा २६ आणि २७ ऑगस्ट रोजी होणार आहे.

परीक्षेसाठी आलेल्या अर्जांमध्ये विज्ञान व तंत्रज्ञान शाखेसाठी सर्वाधिक म्हणजे २१०० अर्ज आले आहेत. त्यानंतर मानव्यविद्याशाखेसाठी १२३३, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेसाठी ७८४ आणि आंतरविद्याशाखेसाठी ६६४ अर्ज आले आहेत. एकूण ७९ विषयांसाठी ही परीक्षा होणार आहे. त्यात रसायनशास्त्र विषयात पीएचडी करण्यासाठी विद्यार्थी अधिक उत्सुक असल्याचे दिसते. रसायनशास्त्रासाठी सर्वाधिक ५८४ विद्यार्थ्यांनी अर्ज केले असून व्यवस्थापन या विषयासाठी २४८ विद्यार्र्थ्यांनी अर्ज केले आहेत.

हेही वाचा – ‘आरे वाचवा’साठी रविवारी सायकल रॅली

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मानव्यविद्याशाखेची परीक्षा २६ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते दुपारी १२ वाजेपर्यंत तर विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्याशाखेची परीक्षा त्याच दिवशी दुपारी २ ते ४ या वेळेत होणार आहे. वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेची आणि आंतरविद्याशाखेची परीक्षा २७ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते दुपारी १२ वाजेपर्यंत होणार आहे, अशी माहिती मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. विनोद पाटील यांनी दिली.तसेच २० ते २३ ऑगस्ट २०२२ दरम्यान ऑनलाईन सराव परीक्षांचेही आयोजन करण्यात आले आहे.