लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : बीएस्सी परिचर्या (नर्सिंग) अभ्यासक्रमाच्या तीन फेऱ्या पूर्ण झाल्या असून चौथ्या फेरीच्या प्रवेशाला १७ सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे. विद्यार्थ्यांना २२ सप्टेंबरपर्यंत महाविद्यालयांमध्ये जाऊन प्रवेश निश्चित करायचा आहे. प्रवेशाची ही अखेरची फेरी असून त्यानंतर विद्यार्थ्यांना संस्थास्तरावर प्रवेश घेता येतील.

नर्सिंग अभ्यासक्रमासाठी राज्यातील ५८ हजार ६३५ विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते. त्यातील ५० हजार २१७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यात ३७ हजार ५२४ मुली तर १२ हजार ६१९ मुलींचा समावेश होता. नर्सिंगच्या प्रवेशासाठी सरकारच्या महाविद्यालयात २५० तर खासगी महाविद्यालयात १० हजार ७२० अशा १० हजार ७२० जागा उपलब्ध आहेत. तीन फेऱ्यांमध्ये सरकारी महाविद्यालयांमध्ये २३४ जागांवर तर खासगी महाविद्यालयांमधील ८४५३ असे ८ हजार ६८७ इतक्या जागांवर प्रवेश झाले. चौथ्या फेरीसाठी सरकारी महाविद्यालयात १६ जागा तर खासगी महाविद्यालयांमध्ये २ हजार २६७ जागा रिक्त आहेत. त्यामुळे चौथ्या फेरीच्या प्रवेशासाठी निवड होणाऱ्या विद्यार्थ्यांना आता प्रवेश घेण्याशिवाय पर्याय नसेल.

आणखी वाचा-एमपीएससीकडून अद्याप सहाय्यक आयुक्त मिळेना, सर्वोच्च न्यायालयच्या आदेशानंतरही उमेदवारांची यादी नाही

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चौथ्या फेरीसाठी शिल्लक असलेल्या जागांचा तपशील राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार १७ सप्टेंबरपासून १८ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजून ५९ मिनिटांपर्यंत विद्यार्थ्यांना पसंतीक्रम भरता येणार आहे. १९ सप्टेंबर रोजी चौथ्या फेरीसाठीची गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार आहे. तर २२ सप्टेंबरपर्यंत सायंकाळी ६ वाजेपर्यंत विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात जाऊन प्रवेश घेता येणार आहेत. त्यानंतर उर्वरित जागांसंदर्भातील प्रवेश हे संस्थास्तरावर राबविण्यात येणार आहे. या फेरीसाठीची गुणवत्ता यादी ही २६ सप्टेंबर रोजी जाहीर होणार असून फेरी ३० सप्टेंबरपर्यंत होईल.